संतांची थोरवी | santanchi thoravi | marathi goshti

संतांची थोरवी | santanchi thoravi | marathi goshti

तुर्कस्तान आणि इराण यांच्यात अनेक वर्षांपासून लढाई चालू होती. या लढाईत तुर्कस्तानला सतत पराभवाचा सामना करावा लागला होता. पण एक दिवस इराणचे प्रसिद्ध संत अत्तारी साहेब हे तुर्कांच्या हाती सापडले. तुर्कांनी त्यांना मृत्युदंड देण्याचे ठरविले.

इराणमधील लोकांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी अत्तारी साहेबांना सोडविण्याच्या बदल्यात त्यांच्या वजनाइतके हिरे तुर्कांना देण्याची तयारी दर्शवली, पण तुर्कांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही.

आपणास ही गोष्ट देखील आवडेल

एकीचे बळ 

येथे क्लिक करा

इराणच्या सुलतानास ही बातमी समजली तेव्हा तो स्वतः तुर्कांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “अनेक पिढ्या आपली लढाई चालू आहे, तरीही तुम्ही आम्हाला जिंकू शकला नाही आणि कदाचित पुढेही जिंकू शकणार नाही. पण आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मी हे सांगायला आलो आहे की, तुम्ही आमचे सगळे राज्य घ्या, पण अत्तारी साहेबांना आम्हाला परत द्या. पैसा व संपत्ती हे एक ना एक दिवस संपून जातात. राज्यही लयाला जाते; परंतु संतांचे नाव व विचार नेहमी अमर असतात. अत्तारी साहेबांना गमावण्याचा इराणला कलंक नको आहे.’ “

तात्पर्य : संत-महात्मे व त्यांचे विचार हीच देशाची खरी संपत्ती असते, म्हणून त्यांची जपणूक केली पाहिजे.