जंगली फुलं ,लहान मुलांच्या गोष्टी, marathi goshti
एका श्रीमंत माणसाने संपूर्ण हिवाळा त्याच्या बागेची नीट देखरेख केली. वसंत ऋतू येताच सर्वत्र अत्यंत सुंदर, मनमोहक फुलांचे ताटवे त्याच्या बागेत सर्वत्र पसरले. मात्र गुलाब, शेवंती, मोगरा यांसारख्या अत्यंत सुंदर आणि सुवासित फुलांसोबतच काही जंगली फुलेही त्या ताटव्यांतून तोंड वर काढताना दिसत होती.
त्या श्रीमंत माणसाने ती सर्व जंगली फुले उखडून फेकून दिली; परंतु काही दिवसांनी ती जंगली फुलं आणि तण पुन्हा उगवले. त्याने विचार केला की, तण नष्ट करणाऱ्या औषधांचा वापर करून ही जंगली फुलंसुध्दा नष्ट करून टाकावीत.
मात्र एका जाणकार व्यक्तीने त्याला तसे न करण्यास सांगितले. कारण त्या औषधाने बागेतील चांगल्या फुलांनाही नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. तेव्हा निराश होऊन त्याने एका अनुभवी माळ्याचा सल्ला घेण्याचे ठरवले.
आपणास ही गोष्ट देखील आवडेल
लक्ष केंद्रित करा
माळी म्हणाला, “ही जंगली फुलं आणि तण तर लग्नाप्रमाणेच असतात. जिथे खूप साऱ्या चांगल्या गोष्टी होत असतात तिथे नको असलेल्या थोड्याफार अडचणी तर निर्माण होतंच असतात. ‘ बनवल्या आहेत.”
तात्पर्य : – आपल्याला जीवनात : आवडत्या गोष्टींबरोबरच नावडत्या गोष्टींचाही तक्रार न करता स्वीकार करा.