वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र कसे मिळवाल?

ज्या शिक्षकांनी वरिष्ठ किंवा निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण चाचणी व स्वाध्याय अभिप्रायसह पूर्ण केले आहे अशा शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत.

हे प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळवायचे याकरिता स्टेप दिलेले आहेत.

सर्वप्रथम आपण खालील लिंक वर क्लिक करा

https://training.scertmaha.ac.in/Certificates/

वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खाली दिलेल्या सूचना येथील त्या काळजीपूर्वक वाचा

ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.

१. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.

२. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.

या सूचना वाचल्यानंतर आपल्यासमोर पुढे जा म्हणून एक बटन असेल त्यावर क्लिक करा

३. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण

१. आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

२. आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट

केल्यानंतर आपणास नोंदणी क्रमांक

इंग्रजी मधील आपले नाव

मोबाईल क्रमांक ईमेल

● प्रशिक्षण गट

• आपले मराठीतील नाव

O शाळेचे नाव

जिल्हा

• तालुका

३. यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी / चूक

असल्यास आवश्यक बदल करावेत.

४. उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.

ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

अशाप्रकारे आपण वरिष्ठ किंवा निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.

E learning व्हिडिओ व माहिती पाहण्यासाठी युट्युब चैनल Subscribe करा

https://www.youtube.com/channel/UC4e3uqNb3fi5SVz4O-bxnDQ?sub_confirmation=1

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Telegram Group

https://t.me/ElearningAbhyas

Thank you🙏