पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊया
खालीलप्रमाणे कोणताही एक चार पाच ओळीचा परिच्छेद मुलांना वाचून दाखवावा. परिच्छेदात आलेले कृतियुक्त शब्द शोधण्यास मुलांना सांगावे येथे आपल्याला मुलांना क्रियापद शिकवायचे नाही आहे. तर शब्दांसोबत हसत खेळत मुलांना लेखन समृद्ध करायचे आहे.
मी सकाळी झोपून उठले. उठल्याबरोबर आरशात जाऊन माझे दात बघितले. काल रात्रीच्या जेवणानंतर मी दात घासले नव्हते म्हणून ते घाण दिसत होते. मला ते बरे वाटले नाही. मी पेलाभरून पाणी घेतले. दात स्वच्छ घासले व आईला जाऊन माझे दात दाखवले आई उद्वारली, “व्वा”.
+ सक्षम होऊ या
| वरील वाक्यातील कृतियुक्त शब्द मुलांनी शोधल्यानंतर मुलांना खालीलप्रमाणे आणखी काही
कृती देता येईल.
उदा. स्वयंपाकाशी कृतींची यादी कर
सराव करूया.
मुलांनी अधिक सक्षमपणे वाक्यरचना तयार करावी लेखनानंद घ्यावा यासाठी खालीलप्रमाणे लेखनवृत्ती घेता येतील.
उदा. काय काय करू? मला
+कल्पक होऊ या
मी उद्या बाजारात……….. (जाणे)
काल खूप पाऊस पडणे
रंगातील कृतियुक्त शब्दात योग्य तो बदलवरून वाक्य पूर्ण करण्यास मुलांना सांगाने,
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका: 25
समजून घेऊ या दातांची बिगा व स्वच्छता
संदर्भ : इ. 3 री पाठ 17 सुंदर दात, स्वच्छ शरीर.
अध्ययन निष्पत्ती : विभिन्न कृती, निरीक्षणे अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात.
लक्षात घेऊ या :
आपले दात आपले दात स्वच्छ असतील तर शरीर सुद्धा निरोगी राहते. आपल्या लहानपणी जे दात येतात, त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते सातव्या आठव्या वर्षी पडतात. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात. त्या दातांना कायमचे दात म्हणतात. कायमचे दात पडले की पुन्हा दात येत नाहीत. म्हणून दातांची काळजी घ्यावी.
दातांची स्वच्छता व निगा कशी राखाल? आपण काहीही खाल्ले की चूळ भरून दातांवरून आतून बाहेरून बोट फिरवावे आणि दात व हिरड्या स्वच्छ कराव्यात, नाहीतर आपण खाल्लेले अन्नाचे कण दातांच्या फटींमध्ये अडकतात व ते कुजून तोंडाला घाणेरडा वास येतो. त्यामुळे दात व हिरड्या खराब होतात. दातांची हीच घाण पोटात जाऊन पोटाचे विकार होतात.
हे टाळायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर दात घासावेत. त्याच बरोबर जीभ व हिरड्यांचीही स्वच्छता करावी. दात घासण्यासाठी ब्रश व पेस्ट चा वापर करावा. काही जण दात घासण्यासाठी कडुलिंब व बाभळीच्या काड्या वापरतात. काही जण दंतमंजन किंवा घरातील राखुंडी वापरातात, परंतु खरखरीत पदार्थाच्या वापरामुळे दातांचे आवरण व हिरड्यांना इजा होऊ शकते.
सराय करू या :
1. सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्वाचे असते, याचे कारण काय असेल?
2. कायमचे दात आल्यानंतर दातांची अधिक काळजी घेणे का गरजेचे आहे ?
3. दात घासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी काय वापरता ?
4. कृती आरशासमोर उभे राहून मोठा ‘आ’ करून आपल्या दातांचे निरीक्षण करा. तुमचे दात पिवळे किंवा काळे पडले असतील तर समजा की, तुम्ही दातांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे हि निरोगी दातांसाठी फार चांगली सवय आहे. तसेच दात घासण्यासाठी ब्रश व पेस्ट यांचाच वापर करावा. दातांच्या आरोग्यासाठी आणखी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते ?
विषय – परिसर अभ्यास
करून पाहूयात १. आपल्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्तींची यादी करा. २. मोठया व्यक्तींचा आदर
राखा. ३. दिव्यांग व्यक्तींना मदत करा..
कुटुंबातील व्यक्तींचे चित्र
आवश्यक साहित्य –
अध्ययन अनुभव –
आपल्या सभोवताली परिसरात विविध प्रकारची प्राणी झाडे आणि वडीलधारी व्यक्ती राहतात त्याविषयी आपण संवेदना दाखवत असतो १. वडीलधारी व्यक्तींच्या संवेदनाचा विचार करा २. घरची व्यक्ती आजारी झाल्यास दवाखान्यात घेऊन जावं
३. आपल्या प्रत्येक सुखद अनुभवात वडिल धारी व्यक्तींना समाविष्ट करून घ्या. काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा
अधिक माहिती येथून मिळेल दीक्षा APP लिंक १. https://bit.ly/3ykDrow
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१. आपला आहार आणि आजोबाचा आहार यात फरक आहे काय?
२. आपल्या आणि मोठ्या व्यक्तींच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात काय ?
३. वयानुसार शरीरात बद्दल होतात काय ?