पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस तेविसावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी  – दिवस तेविसावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

शिक्षकांनी खालीलप्रमाणे फोडी वाचण्यास द्यावी व उत्तरे शोधण्यास सांगावी,

कोई काळा काळा रंग. वस्तू कुरतडण्यास दंग

मनीमाऊ येताच पळून जातो

आणि बिळात जाऊन दडून बसतो.

+ सक्षम बनू या

ओळखा पाहू कोण ?

हिरवा, पिवळा रंग…..

आहे आंबट गोड नव माझी……

आहे क जीवनसत्व भरपूर……

गाव माझं नागपूर……..

ओळखा पाहू मी कोण ?.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वरीलप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची कोडी वाचायला द्यावीत. विद्यार्थी त्यांच्या पूर्वानुभवावरून त्याचे उत्तर शोधतील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तर शोधण्यास अडचण येईल त्यांना शिक्षकांनी आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे.

+ सराव करूया

१) शिक्षक मुलांना इ.४ थी च्या पाठ्यपुस्तकातील पान नं ३२ वरील कोड वाचण्यास सांगतील

व त्याचे उत्तर शोधण्यास सांगा.

२) शिक्षक मुलांना खालील कोडी वाचून ओळखण्यास सांगतात.

१) काळ्या राणी उभी तलवार.

२) सगळीकडे आहे, जाणवते पण दिसत नाही.

३) दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी.

+ कल्पक होऊ या

१) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना २ कोडी बनविण्यास सांगावी. २) वेगवेगळ्या कोड्यांचा संग्रह बनविण्यास सांगावेत.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 23

समजून घेऊ या : नैसर्गिक आपत्ती- अवकाळी पाऊस, पूर, भूकंप, त्सुनामी

संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण 23 नैसर्गिक आपत्ती

अध्ययन निष्पत्ती: निरीक्षणे / अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या आकृतिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. भूकंप, पूर) लक्षात घेऊ या :

नैसर्गिक आपत्ती :

बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याचे आपण ऐकतो. कुठे भूकंप होतो, तर कुठे पूर येतो. कुठे त्सुनामी येते, तर कुठे अवकाळी पाऊस होतो. या दुर्घटनांमध्ये अनेक माणसे जखमी होतात. काही माणसे मृत्युमुखी पडतात. लोकांची घरे पडतात. पाळीव जनावरे मरतात. काही दुर्घटनांमध्ये शेतातल्या उभ्या पिकाचा नाश होतो. मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. ते परत पहिल्यासारखे होण्यासाठी अनेक दिवस लागतात. अशा घटनांनी घाबरून जाऊ नये. त्यापेक्षा या आपत्तींना तोंड कसे द्यावे याची माहिती घेणे फायद्याचे ठरते.

अवकाळी पाऊस :

पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळीही पाऊस पडतो अशा पावसाला ‘अवकाळी पाऊस’ म्हणतात. हिवाळ्यात अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतो. पण या काळात पाऊस फार जोराचा झाला, तर शेतात पाणी साचते. आंब्याचा मोहोर पण या पावसामुळे गळून किंवा कुजून जातो व आंब्याचे उत्पन्न कमी होते.

पूर :

पावसाळ्यात कधी कधी तीन-चार दिवस सतत जोराचा पाऊस पडून नदीच्या पाण्याची पातळी वाढते. त्याला आपण नदीला पूर येणे असे म्हणतो. पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते. पुरामुळे नदीकाठची मातीची घरे कोसळतात. गुरे आणि माणसे बुडून मरण्याची शकयता असते. पुराच्या पाण्याला ओढ फार असते. पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे ठरते. भूकंप :

जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात. त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण होतात. काही सेकंद जमीन हादरते. त्याला भूकंप म्हणतात. त्यानंतर परत सारे शांत होते. ज्या भागात भूकंप होतो, तिथली घरे हादस्तात. घरातल्या वस्तू धडाधड पडतात. कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे तर साफ कोसळतात. त्यांचे ढिगारे होतात. त्या ढिगाऱ्याखाली अडकून माणसे दगावतात. अनेक माणसे जखमी होतात. भूकंपाच्या केंद्राजवळ नुकसान जास्त होते.

भूकंपामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो किंवा ती जखमी होतात. भूकंप झाला तर घाबरू नये. भूकंप काही सेकंद होतो. भूकंप होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात. त्यामुळे माणसे दगावतात किया जखमी होतात. म्हणून भूकंप होत आहे असे लक्षात येताच खाटेखाली किंवा देवलखाली बसावे किंवा दाराच्या चौकटीत उभे राहावे. भूकंप थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडून शाळेजवळ मैदानात किंवा मोकळ्या जागेत जमा व्हावे.

त्सुनामी :

ज्यावेळी भूकंपाचा उगम समुद्रात असतो, त्या वेळी भूकंपामुळे समुद्रात खूप मोठया लाटा निर्माण होतात. एक-एक लाट इमारतीइतकी उंच असते. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतात. या लाटांना त्सुनामी म्हणतात. किनाऱ्यावर माणसांची वस्ती असली आणि तिथे त्सुनामी झाली तर खूप मोठी वाताहत होते. या लाटेच्या तडाख्यात जी माणसे किंवा प्राणी सापडतात, ते त्या लाटेसमोर अगदीच हतबल असतात. लाटेच्या पाण्यात बुडून मरण्यापलीकडे ते दुसरे काहीही करू शकत नाहीत.

सराव करु याः

प्र. 1) काय करावे बरे?

अ) तुमच्या गावात पूर येणार आहे.

आ) शाळेत असताना भूकंपाचे धक्के बसत आहेत.

प्र. 2) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) अवकाळी पावसामुळे शेतीचे काय आणि कसे नुकसान होते ते तुमच्या शब्दात लिहा.

आ) त्सुनामीचा किनान्यावरील जनजीवनावर कोणते परिणाम होतो ?

“””

प्र. 3) एका नैसर्गिक आपत्तीविषयी वर्तमानपत्रात आलेली बातमी मिळवा व थोडक्यात लिहा.

 विषय –  परिसर अभ्यास  

1. आपल्या कुटूंबात कोण कोण राहतो?

2.

3. तुमच्या कुटूंबातील सर्वात वयस्कर व्यक्ती कोण आहे?

मदत हवी आहे का?

१. https://bit.ly/3utubcxi

२.https://bit.ly/3fPFEau

करून पाहूयात

1. घरातील व्यक्तींचा वयानुसार क्रम लावा.

2. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत तुमचे नाते व त्यांचे नाव सांगा.

आवश्यक साहित्य

• कुटुंबवृक्षाचा चार्ट

अध्ययन अनुभव

आपण आपल्या कुटुंबात जन्मतो वाढतो आई वडील आपल्या लहानाचे मोठे करतात आणि आपली काळजी घेतात. १. आपल्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तयार करा. ३. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कसा एकमेकांशी कसा वागतो ते निरीक्षण करा. ४. छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब यांचा शोध लावा.

२. छोटे कुटुंब म्हणजे काय ते सांगा.

काय समजले? वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले वा काय शिकण्यास मिळाले ?

या प्रश्नांची उत्तरे शोधू 1. छोटे कुटुंब म्हणजे काय ?

2. मोठे कुटुंब म्हणजे काय ?

3. विस्तारित कुटुंब म्हणजे काय?

4. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय?