बालदिन सोपा मराठी निबंध । Baldin Marathi Nibandh
बालदिन सोपा मराठी निबंध , Baldin Marathi Nibandh , children’s day speech in marathi , 14 november day
कागदाची नाव होती ,पाण्याचा किनारा होता
मित्रांचा सहारा देण्याची मस्त मन हे वेडे होते
कल्पनेच्या दूनियेत जगत होतो कुठे आलो या समजुतदारीच्या दुनियेत
यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते
कवितेच्या सुंदर ओळी बालपणाचे महत्त्व सांगतात
प्रत्येकाच्या आयुष्याचा एक सुवर्णकाळ म्हणजे त्याचे बालपण हेच सर्वांना आवडणारे बालपण जगणे यांनी जपणे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व समाजात जागरूकता वाढविण्यासाठी ( children’s day date )14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन (baldin ) म्हणून साजरा केला जातो . children’s day in marathi
14 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस होय. पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांच्यामध्ये रमायचे . त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. पंडित नेहरू लहान मुलांच्या सोबत आपुलकीने गप्पा मारायचे त्यांना लहान मुलांचे विषयी विशेष प्रेम होते.
आजची लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहेत हे त्यांचे स्पष्ट मत होते आणि त्यामुळे 14 नोव्हेंबर 1965 पासून पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो .
बाल्यावस्थेत चा काळ हा संस्काराचा काळ असतो मातीच्या गोळ्याप्रमाणे असणाऱ्या लहान मुलांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर ते भविष्यात देशाचे आदर्श नागरिक होऊ शकते या विचाराने पंडित नेहरू मी बालकांसाठी विविध योजना तयार केल्या .
बालदिन साजरा करताना आपण पंडित नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवे. मुला-मुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे .त्यांना आपल्या आवडी-निवडी छंद कला जोपासण्यासाठी समान व योग्य संधी मिळायला हवेत .आपले आयुष्य फुलवण्याचा आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधी मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत.
बालकांनाही आनंद घेण्याचा मौज मजा मस्ती करण्याचा हक्क आहे .आणि ह्या मुलांमधून अस देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक तयार होणार आहे .हा हक्क मिळालेल्या आपल्या मुलांनी आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याबाबत जाणीव मुलांच्या मनात रुजवली तर ते भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतील . याशिवाय त्यामुळे वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या बालकाला ही आपल्या प्रयत्नांमुळे चांगले आयुष्य मिळू शकेल .
बाल दिनाच्या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात .शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात . विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी अभिव्यक्तीसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात सरकार मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते जाते .
बालदिन हा एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो वर्षभर साजरा करण्यात यावा. भारतासारख्या विकसनशील देशात बालकांच्या बाबतीत विविध समस्या व अडचणी सातत्याने दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे खूप गरजेचे आहे .बालकांचे हक्क व त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्यात याव्यात .
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांच्या विषयी वाटणाऱ्या प्रेमाची आठवण व बालकांच्या हक्कांची जाणीव यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो .
आपणास बालदिन ( baldin in marathi ) हा निबंध माहिती children’s day speech in Marathi बालदिन भाषण कसे वाटले ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व आपल्या इतर मित्रांना पर्यंत ह्या निबंधाची लिंक अवश्य शेअर करा .
आपणास हे निबंध देखील आवडतील
Mình thấy bài này bổ ích hơn nhiều bài khác.