इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 38
विषय – गणित
थोडं समजून घेऊ
- तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात.
- त्रिकोणाचे शिरोबिंदू, बाजू व कोन यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात. त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून
- ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात.
- ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणास समविभुज त्रिकोण म्हणतात.
- ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात, त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाचे प्रकार कोनांवरून –
- ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात, त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात.
- ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो, त्या त्रिकोणास विशालकोन त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाचे गुणधर्म
- त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.
- त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते.
चला सराव करूया