इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 38
विषय – मराठी
जाणून घेऊ या
कृती – सार्वजनिक सूचना व त्याचे स्वरूप जाणून घेणे. सूचनांचे प्रकटवाचन व मूकवाचन करणे.
कार्यपद्धती सार्वजनिक ठिकाणे जसे की बगीचा, सिनेमागृह, बाजार, सार्वजनिक शौचालय, मैदाने, पर्यटन स्थळे, गड व किल्ले, विविध प्रदर्शने, अग्निशामक सेवा, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन या ठिकाणी कशा प्रकारच्या व कोणकोणत्या सूचना असतात याची चर्चा करावी. याच्या नमूना शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर सादर करावा. सूचनाचे प्रकट वाचन करून दाखवावे. आपला परिसर व गाव यात, वेगवेगळ्या ठिकाणी जसे की दवाखाना, ग्रामपंचायत, उपासना ठिकाणे, सायकल दुकान, किराणा दुकान, पोस्ट ऑफिस या ठिकाणी असलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांना निरीक्षण व प्रकटवाचन करण्याची संधी द्यावी. त्या सूचना वहीत लिहून आणावयास सांगाव्यात. शाळेतील सार्वजनिक ठिकाणी जसे क्रीडांगणे, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, बगीचा, प्रयोगशाळा. या ठिकाणी कोणकोणत्या सूचना असतील याचे विद्यार्थ्यांना स्वतः लेखन करून वाचन करण्यास सांगावे.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी