[ad_1]
पोस्टचे आर्काइव्ड व्हर्जन या ठिकाणी पाहा
फेसबुक पेज ‘मेरा हिंदुस्थान’ नेही हा व्हिडिओ मंगळवारी याच दाव्याने शेअर केला होता.
व्हिडिओच्या बॅकग्राउंडला एक व्यक्ती जो संभवतः व्हिडिओ बनवत आहे. तो म्हणत आहे की, या ठिकाणी करोनाची भीती नाही का?, यांना रोखले पाहिजे.
यूट्यूब चॅनेल ‘Sirf News’ नेही हा व्हिडिओ अपलोड केला आहे. तसेच कॅप्शन लिहिले आहे की, १३ मार्च २०२० रोजी शेकडो मुस्लिमांनी पूर्व दिल्लीच्या पटपडगंज इंडस्ट्रियल भागात मशीद समोर एकत्र येऊन नमाज अदा केली. व्हिडिओचे शीर्षक ‘Muslims violate social distancing again, now at Patparganj, Delhi’ होते.
खरं काय आहे ?
रस्त्यावर शेकडो मुस्लिमांनी नमाज अदा केल्याचा हा व्हिडिओ देशभरात लॉकडाऊन करण्यात आला त्याआधीचा आहे. या व्हिडिओतून जो दावा करण्यात येत आहे तो चुकीचा आणि खोडसाळपणाचा आहे.
कशी केली पडताळणी ?
गुगल क्रोमच्या एक्सटेंशन InVID च्या मदतीने आम्ही या व्हिडिओला अनेक फ्रेम्समध्ये विभागले. त्यानंतर एक एक करून सर्वांना रिवर्स इमेज सर्च केले.
एका फ्रेमला रिवर्स सर्च रिझल्टमध्ये आम्हाला फेसबुक पेज ‘आदर्श व्यवस्था निर्भीक संविधान’ नावाच्या पेजवर एक असाच व्हिडिओ मिळाला. जो आता शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ २१ मार्च २०२० रोजी पोस्ट करण्यात आला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २४ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली होती. व लॉकडाऊन २५ मार्चपासून लागू करण्यात आला होता. म्हणजेच हा व्हिडिओ लॉकडाऊनच्या आधीचा आहे.
याशिवाय हा व्हिडिओ आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पेक्षा काही सेकंदांनी मोठा होता. तसेच बॅकग्राउंडला जी व्यक्ती बोलत आहे ती तारीख २० होती. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत हा भाग ऐकायला मिळत नाही.
निष्कर्ष
दिल्लीत नमाज अदा करण्यासाठी शेकडो मुस्लिम रस्त्यावर दिसत असलेला व्हिडिओ आताचा नाही तर लॉकडाऊन लागू करण्याआधीचा आहे, असे ‘मटा फॅक्ट चेक‘च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
[ad_2]
Source link