[ad_1]
रिलायन्स जिओने डिसेंबर २०१९ मध्ये टॅरिफ महाग करण्यात आल्यानंतर युजर्सच्या संख्ये फार मोठा फरक पडला नाही. एअरटेल कंपनीने जानेवारीत ८.५ लाख नवीन युजर्स जोडले आहेत. तर व्होडाफोन – आयडियाने डिसेंबर महिन्यात टॅरिफ महाग करण्यात आल्यानंतर ३०.६२ लाख युजर्स गमावले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओने आपला टॅरिफ तीन वर्षात पहिल्यांदा १४ वरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढवला होता. त्यानंतर जिओचा युजर बेस जानेवारीमध्ये वाढून ३३.७५ कोटी आणि एअरटेलचा युजर बेस वाढून ३२.८१ कोटी झाला होता. व्होडाफोन – आयडियाचा युजर बेस ३२.८९ कोटी होता. टेलिकॉम कंपन्यांच्या युजर बेसची ही आकडेवारी ट्रायने शुक्रवारी जारी केली आहे.
वाचाः लॉकडाऊनमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?
ट्रायने दिलेल्या माहितीनुसार, मार्केट शेअर ३२.१४ टक्के वाढून तो ३२.५६ टक्के झाला आहे. तर एअरटेल आणि व्होडाफोन मार्केट शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. एअरटेलचे मार्केट शेअर २८.४३ टक्के घसरले असून ते २८.३८ टक्के आणि व्होडाफोनचे २८.८९ टक्के घसरून २८.४५ टक्क्यांवर आले आहेत. अॅक्टिव युजर्सच्या संख्येत एअरटेल युजर्स ९५.३७ टक्के, व्होडाफोन-आयडियाचे ९०.३६ टक्के आणि जिओचे ८२.२६ टक्के आहे. जानेवारी २०२० मध्ये भारतात मोबाइल युजर्स बेसमध्ये ५० लाखांची वाढ झाली आहे.
वाचाः ‘रेडमी नोट ९ प्रो’च्या जाहीरातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी
[ad_2]
Source link