[ad_1]
शाओमी, ओप्पो कंपनीच्या स्मार्टफोन किंमतीत वाढ
पाहा किंमत
शाओमीच्या नवीन Mi TV 4A टीव्हीची किंमत १९९९ युआन म्हणजेच २१ हजार ४०० रुपये किंमत आहे. तर फुल स्क्रीन टीव्ही प्रो ७५ इंचाची किंमत ५,९९९ युआन म्हणजेच ६४ हजार ५०० रुपये आहे. हे दोन्ही टीव्ही ९ एप्रिल रोजी शाओमीच्या वेबसाइटवर क्राऊडफंडिंगसाठी जारी केले जातील. Mi Full Screen TV Pro 75-inch आपल्या रेंजमधील सर्वात महागडे मॉडेल आहे. याआधी कंपनीने ६५ इंचाचा टीव्ही ३३९९ युआनच्या किंमतीत म्हणजेच भारतात ३४ हजार रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते.
सरकारकडून आरोग्य सेतू मोबाइल अॅप लाँच
पाहा खास वैशिष्ट्ये
Xiaomi फुल स्क्रीन टीवी प्रो इंचाच्या टीव्हीत एक अॅल्यूमिनियम केसिंग आणि एक मेटल बेस प्लेट दिली आहे. 4K डिस्प्लेचे सर्व बाजुला किनाऱ्यांवर ९७.७ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो सह बेजल दिले आहे. हे १२nm FinFET १.९ गीगाहर्ट्ज़, ६४ बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. सर्व एमआय टीव्ही मॉडेल प्रमाणे ७५ इंचाचे मॉडेलही पॅच वॉलओएस वर चालतो. स्मार्ट टीव्ही अनेक प्री इन्स्टॉल अॅप करण्यात आले आहेत. तसेच व्हॉईस असिस्टेंट इंटिग्रेशन, डॉल्बी ऑडिओ आणि IoT डिव्हाईस कनेक्ट करण्याचा पर्याय उपलब्ध आहेत.
[ad_2]
Source link