Jio WiFi : जिओः मोबाइल नेटवर्क नाही?, तरीही, व्हिडिओ-व्हॉईस कॉल करा – jio wifi calling user can call without mobile network

[ad_1]

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या काळात जर तुम्हाला मोबाइल नेटवर्क मिळत नसेल तर आता चिंता करण्याची आणि घाबरून जाण्याची गरज नाही. रिलायन्स जिओने आपल्या युजर्संसाठी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने विना टेलिकॉम नेटवर्क मध्येही तुम्ही कोणालाही कॉल करू शकाल. या फीचरने नाव वाय फाय कॉलिंग सर्विस (Jio WiFi calling service) आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही नेटवर्क नसले तरी तुम्हाला व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करता येणार आहे.

केंद्र सरकारकडून आरोग्य सेतू मोबाइल अॅप लाँच

जिओ कंपनीने ही सर्विस आपल्या युजर्संसाठी फ्री देणे सुरू केले आहे. यासाठी युजर्संना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाहीत. या सेवेचा उपयोग करायचा असेल तर सर्वात आधी या युजर्संकडे प्रीमियम स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. सेटिंगमध्ये काही बदल केल्यानंतर तुम्हाला वायफायच्या माध्यमातून कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करता येवू शकतो. वायफाय कॉलिंग सर्विसचा वापर त्यावेळी केला जावू शकतो ज्यावेळी तुमच्या फोनमध्ये नेटवर्क येत नाही.

व्होडाफोन कॉलर ट्यून प्लान, ६७ रुपयांत ३ महिने वैधता

या फीचरच्या मदतीने कॉल रिसिव करता येवू शकतो किंवा कॉल करता येवू शकतो. जिओ युजर्संना ही सेवा अगदी फ्रीमध्ये मिळत आहे. तसेच यात व्हाईस आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी VoLTE आणि वाय फाय सर्विस दरम्यान स्विच करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जिओने नुकतीच लॉकडाऊनच्या कालात १००० मिनिट्स फ्री आणि १०० एसएमएस सह १७ एप्रिल पर्यंत वैधता वाढवण्याची घोषणा केली होती. जिओ युजर्संना कोणतीही अडचण येवू नये, यासाठी कंपनी वेगवेगळे प्लान लाँच करीत आहे.

मैत्रीच्या नात्याने फुलले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस

अँड्रॉयड

>> अँड्रॉयड मोबाइलची सेटिंग्स ओपन करा

>> या ठिकाणी कॉल सेटिंग्समध्ये जा

>> मोबाइलमधील वायफाय कॉलिंग पर्याय सर्च करा

>> या ऑप्शनच्या समोर दिसत असलेल्या टॉगलला इनेबल करा

आयओएस

>> आपल्या आयओएस डिव्हाइसच्या सेटिंग्स अॅप ओपन करा

>> या ठिकाणी फोनच्या सेटिंग्सवर टॅप करा

>> फोनच्या सेटिंग्समध्ये तुम्हाला वायफाय कॉलिंग दिसेल

>> समोर दिसत असलेल्या स्विचला इनेबल करा

युजर्संना झटका, नोकियाचे स्मार्टफोनही महाग



[ad_2]

Source link

Leave a comment