[ad_1]
Poco X2 ची किंमत आणि फीचर्स
पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये रियर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर किंवा ईएमआय खरेदीवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या खरेदीवर आणखी ५ टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.
अँड्रॉयड १० ओएस वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर Adreno 618 GPU आणि ८ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात २० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि २७ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. हा स्मार्टफोन ६८ मिनिटात शून्य ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे. रियर पॅनेलवर ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सह २ मेगापिक्सल, ८ प्लस, २ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे.
रेडमीचे दोन नवीन स्मार्टफोन उद्या लाँच होणार
ट्विटरवर २ वर्षात महिलांचे ‘हे’ हॅशटॅग ट्रेंडिंग
१०० ₹ पेक्षा कमी किंमतीचे बेस्ट प्रीपेड प्लान
[ad_2]
Source link