bsnl prepaid stv : BSNL च्या २४७ ₹ प्लानमध्ये ३ GB डेटा – bsnl prepaid stv 247 offers 3gb daily data and unlimited free voice calls

[ad_1]

नवी दिल्लीः टेलिकॉम इंडस्ट्रीजमध्ये वाढत्या स्पर्धेत भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने बेस्ट प्लान्स लाँच केले आहेत. कंपनीने आता २४७ रुपयांचा एक खास टॅरिफ व्हाउचर आणला आहे. यात युजर्संना ३ जीबी डेटा दिला जात आहे. ज्या युजर्संना व्हिडिओ पाहायला जास्त आवडते अशा युजर्संसाठी बीएसएनएलने हा प्लान आणला आहे.

२४७ रुपयांच्या या प्लानची वैधता ३० दिवस इतकी आहे. कंपनी युजर्संना रोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस फ्री ऑफर करीत आहे. कॉलिंगसाठी या प्लानमध्ये दररोज २५० मिनिट युजर्संना मिळतात. कॉलिंगच्या बाबतीत हा प्लान एअरटेल आणि व्होडाफोनपेक्षा मागे आहे. कारण, दोन्ही कंपन्या युजर्संना ट्रू अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देते.

करोनाची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी ‘हे’ करा


१९९९ रुपयांचा प्लान


बीएसएनएलने २४७ रुपयांच्या प्लाननंतर १९९९ रुपयांचा वार्षिक प्लान्सचे फायदे वाढवले आहेत. या वार्षिक प्लानमध्ये आता दोन महिन्यांसाठी इरॉज नाऊचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस सह अनिलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जात आहे. ही अनलिमिटेड कॉलिंग २५० मिनिटांच्या कॅपिंगसह येते. कंपनीने ९९८ रुपयांच्या प्लानला सुधारित केले आहे. या प्लानमध्ये आता ३० दिवसांचा अतिरिक्त वैधता देण्यात आली आहे. या प्लामध्ये आधी २४० दिवसांची वैधता होती. आता यात ही २७० दिवसांची करण्यात आली आहे. ३० दिवसांची अतिरिक्त वैधता ही ६ जून २०२० पर्यंत वैध आहे. या प्लानमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे.

रिचार्ज महागल्याने ‘या’ कंपन्यांना बसला झटका

रियलमी ६ चा आज पहिला सेल; ‘या’ ऑफर्स

पालकांच्या मोबाइलवर मुलांचा सोशल मीडिया



[ad_2]

Source link

Leave a comment