[ad_1]
ओप्पो वॉचचा पहिला सेल चीनमध्ये २४ मार्चपासून सुरू होणार आहे. या वॉचची किंमत जवळपास १५ हजार ९०० रुपये असणार आहे. ओप्पो स्मार्टवॉच युजर्स सहजपणे आपल्या फोनमध्ये हेल्थ अॅपने याला कनेक्ट करू शकता. आपल्या अॅक्टिविटी आणि हेल्थला ट्रॅक करू शकतील. अँड्रॉयड युजर्सला आपल्या फोनमध्ये HayTap Health App हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. यामुळे ही वॉच कनेक्ट करता येईल. ही सिंगल चार्जवर २१ दिवसापर्यंत चालू शकते. ओप्पो वॉचमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. १.९१ इंचाचा अमोलेड डिस्प्ले ७२.९६ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो दिला आहे. डिस्प्लेचा रिझॉल्यूशन ४०२x४७६ आणि पिक्सल डेंसिटी ३२६ पीपीआय दिला आहे. या वॉचमध्ये अॅल्युमिनिअम फ्रेम आणि ३डी कर्व्ड ग्लास दिला आहे. बॅक पॅनेलवर ३डी सेरेमिक डिझाइन यात आहे.
ओप्पोने या वॉचमध्ये ई-सिमचे सपोर्ट दिला आहे. म्हणजेच स्मार्टफोनशिवाय वॉचमध्ये एक सिम किंवा नंबरचा सपोर्ट मिळणार आहे. ओप्पोने या वॉचमध्ये हेल्थ आणि फिटनेस ट्रँकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. यात एक्सरसाइज सेन्सर्स दिले आहे. तसेच यात वॉटर रेसिस्टेंट दिले आहे.
WhatsApp स्टेट्स आवडलंय?, असं सेव्ह करा
[ad_2]
Source link