coronavirus : फेसबुकच्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण, लंडन, सिंगापूरमधील ऑफिस बंद – facebook closed singapore and london office due to coronavirus

[ad_1]

नवी दिल्लीः चीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसने जगभरात भीती निर्माण केली आहे. करोनाचा फटका फेसबुकला सुद्धा बसला आहे. सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकमधील एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच सिंगापूर, लंडन आणि शांघाय येथील कार्यालय तातडीने बंद केले आहेत. लंडन आणि सिंगापूर हे दोन्ही कार्यालय साफसफाईसाठी बंद करण्यात आल्याची माहिती फेसबुककडून देण्यात आली आहे. शांघाय येथील कार्यालय फेसबुकने याआधीच बंद केले आहे.

फेसबुकचे प्रवक्त्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सिंगापूर येथील मरीना वन ऑफिस मध्ये शुक्रवारी एका कर्मचाऱ्याला करोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कर्मचाऱ्याला सध्या १३ मार्चपर्यंत कार्यालयात न येण्यास सांगितले आहे. कार्यालयात येण्याऐवजी वर्क फ्रॉम होम करण्यास सांगतिले आहे. ज्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. तो २३ ते २६ फेब्रुवारीपर्यंत लंडन कार्यालयात गेला होता. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून लंडन कार्यालय सोमवारपर्यंत बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. या दोन दिवसात कार्यालयाची सफाई करण्यात येणार आहे, या दरम्यान फेसबुकचे कर्मचारी घरूनच काम करतील, असे फेसबुक प्रवक्त्याने सांगितले आहे.

याआधी फेसबुकने अनिश्चित काळासाठी शांघाय मधील कार्यालय बंद केले आहे. इटली आणि दक्षिण आफ्रिकाचे कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सॅन फ्रान्सिस्को येथील कर्मचाऱ्यांनाही घरातून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ओप्पोची स्मार्टवॉच लाँच, अॅपल वॉचला टक्कर

WhatsApp स्टेट्स आवडलंय?, असं सेव्ह करा

१ GB डेटाची किंमत वाढवा, जिओची मागणी

३ कॅमेऱ्यासह Moto G8 स्मार्टफोन लाँच



[ad_2]

Source link

Leave a comment