reliance jio : १ GB डेटाची किंमत वाढवा, जिओची मागणी – reliance jio suggests floor tariffs at rs 20 per gb over six months

[ad_1]

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ युजर्संसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. कंपनीने डेटामध्ये दरवाढ करण्याची मागणी केली आहे. प्रति १ जीबी डेटासाठी किमान १५ रुपये करा, तसेच वर्षभरात ही फ्लोर प्राइस वाढवून ती २० रुपये प्रति जीबी करा, अशी मागणी जिओने ट्रायकडे केली आहे. ईटी टेलिकॉमच्या एका रिपोर्टमध्ये जिओने म्हटले की, वायरलेस डेटा रेट आता कंज्युमरच्या डेटा कंजप्शनश वर आधारित असणार आहे. तसेच जिओने व्हाइस टॅरिफमध्ये सध्या काही बदल सुचवले नाही.

जिओने ट्रायला दिलेल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये टेलिकॉम सर्विस मध्ये येत असलेल्या टॅरिफ समस्यांचा उल्लेख केला. भारतीय युजर्स किंमतीवरून फार संवेदनशील आहेत. म्हणून फ्लोर प्राइस एकवेळ किंवा दोन-तीन वेळा वाढवता येवू शकते. एजीआर भरण्यास वेळ लागत असल्याने टेलिकॉम इंडस्ट्रीजला मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत. व्होडाफोनला ५३ हजार कोटी आणि एअरटेलला ३५ हजार कोटी रुपये भरण्यास सांगतले आहे. जिओने म्हटले की, टार्गेट पूर्ण करण्यासाठी फ्लोर प्राइस ठरवल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. रिलायन्स जिओ फायबरच्या युजर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये जिओ फायबर युजर्सची संख्या ८ लाख ६० हजार झाली. जिओचे फायबर युजर्स इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी आहेत. सरकारी कंपनी बीएसएनएलचे ८० लाख ३९ हजार युजर आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी s20 चा आज पहिला सेल

ट्विटरवर फक्त Tweet नव्हे तर Fleet ही करा

Tata Sky चा झटका, सेटटॉप बॉक्स महागला

स्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही

Realme 6, Realme 6 Pro भारतात लाँच



[ad_2]

Source link

Leave a comment