fleet : ट्विटरवर फक्त Tweet नव्हे तर Fleet ही करा – twitter is testing facebook story like fleet feature how this works

[ad_1]

नवी दिल्लीः ट्विटरवर अनेक दिवसांपासून एडिट ट्विट फीचरची मागणी होत होती. परंतु, सध्या हे फीचर येण्याची शक्यता कमीच आहे. परंतु, कंपनीने आणखी एक नवं फीचर आणण्याची तयारी सुरू केली आहे. या फीचरची चाचणी सुरू असून हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या फीचरसारखे आहे.

आतापर्यंत केवळ ट्विटरवर ट्विट करण्याची सुविधा होती. परंतु, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या स्टोरी आणि स्टेट्सचे फीचर या ठिकाणी नाही. परंतु, आता ट्विटरवर फ्लिट नावाचे एक नवीन फीचरची चाचणी करण्यात येत आहे. या नवीन फीचर अंतर्गत ज्यावेळी एखादा व्यक्ती ट्विटरवर काही पोस्ट करेल. त्यावेळी एक वेगळी टाइमलाइन दिसेल. तसेच हे २४ तासांनंतर आपोपाप बंद होईल. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेट्स यासारखे हे नवे फीचर असणार आहेत. ट्विटर ग्रुप प्रोडक्ट मॅनेजर यांनी एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले, ट्विटरच्या माहितीनुसार, आता युजर्संना दुसऱ्या पद्धतीने चर्चा करण्यासाठी आणि कमी वेळात जास्त कंट्रोल करणारं फीचर देण्यात आले आहे. सध्या हे फीचर ब्राझीलमध्ये सुरू करण्यात येत आहे, असे कंपनीने सांगितले आहे.

Fleet अंतर्गत युजर्संना २८० टेक्स्ट कॅरेक्टर अॅड करू शकता येईल. यात फोटो किंवा जीफ फाइल आणि व्हिडिओ सुद्धा पोस्ट करता येईल. ज्या अकाउंट्सला फॉलो केले आहे. त्यांचे फ्लिट वरच्या बाजुच्या टॅबमध्ये दिसेल. कोणत्याही फ्लिटला रिट्विट करता येऊ शकणार नाही. इमोजीसाठी फ्लिटला रिस्पॉन्ड करू शकता येईल. ज्यापद्धतीने फेसबुकवर रिअॅक्शन दिले जाते. जर Fleet पसंत पडले नाही तर सरळ रिप्लाय करता येऊ शकतो. लवकरच हे फीचर जगभरात लाँच करण्यात येणार आहे.

स्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही

फॅक्ट चेकः दिल्ली पोलिसाची मुलाला मारहाण?

लावाचा नवा फोन लाँच; किंमत फक्त ९९९ ₹

मार्च महिन्यात ‘हे’ स्मार्टफोन लाँच होणार



[ad_2]

Source link

3 thoughts on “fleet : ट्विटरवर फक्त Tweet नव्हे तर Fleet ही करा – twitter is testing facebook story like fleet feature how this works”

Leave a comment