[ad_1]
रियलमी ६ सीरिजचे दोन्ही स्मार्टफोन ३ प्रकारात आले आहे. Realme 6 Pro चा ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम प्लस आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टवर या फोनचा पहिला सेल असताना अॅक्सिक बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यानंतर १ हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. रियलमी ६ च्या ४ जीबी पल्स ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये असणार आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये असणार आहे.
रियलमी ६ स्मार्टफोन व्हाइट आणि कॉमेट ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा पंचहोल डिस्पले दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलिओ जी९०टी प्रोसेसर दिला आहे. रियलमी ६ मध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. फोनमध्ये बॅकला १६ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात एवन ब्यूटी मोड, पोट्रेट मोड, एचडीआर सेल्फी मोड देण्यात आले आहेत. रियलमी ६ मध्ये ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि ३० वॅट फ्लॅश चार्जर दिला आहे. ६० मिनिटात हा फोन शून्य ते १०० टक्के फुल चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.
Tata Sky चा झटका, सेटटॉप बॉक्स महागला
स्मार्टफोन स्वच्छ ठेवल्यास करोनाची भीती नाही
[ad_2]
Source link