♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस १०

विषय  – मराठी 

खालील प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या अनुभवावरून लिहा

१. आपल्याला जर प्रवास करावयाचा असेल तर आपण कोणकोणती तयारी करतो? 

उत्तर : ………………………………………….

२. शालेय वयात तुम्ही एखाद्या सहलीला गेला असाल? किंवा क्षेत्रभेट केली असेल. किंवा तुमच्या पालकांसोबत कोठे फिरायला गेला असाल. त्यासाठी तुम्ही काय-काय पूर्वतयारी केली होती? ते आठवून लिहा.

उत्तर : ………………………………………….

खालील माहिती समजावून घ्या

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१. शेतकऱ्याच्या घरात धान्य आल्यानंतर आपल्या ताटात भाकरी येईपर्यंतचा पुढचा प्रवास तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : ………………………………………….

२. पिठाव्यतिरिक्त भाकरी बनविण्यासाठी अजून कशाकशाची गरज असते ?

उत्तर : ………………………………………….


विषय  – गणित

 विषय  – इंग्रजी

Activity no-10 

खालील पैकी कोणत्याही एका विषयाचे वर्णन करा 

classroom, school, things in school bag etc.

विषय  – विज्ञान    कृतीपत्रिका १०

इयत्ता सातवी प्रकरण-7 गती बल आणि कार्य 

खालील माहिती  समजावून घ्या 

अंतरः एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता, प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. अंतर ही अदिश राशी होय.

विस्थापनः एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. विस्थापन ही सदिश राशी आहे. अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS मापन पद्धतीतील एकक मीटर (m) हेच आहे.

चाल: एखादया वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात.

चाल = एकूण कापलेले अंतर / एकूण लागलेला वेळ SI पद्धतीत चाल m/s मध्ये व CGS पद्धतीत cm/s मध्ये मोजतात.

त्वरण :

उदाहरणे : 1) तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळला असाल. घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीचा वेग कमी असती, मधे तो वाढतो, शेवटी तो कमी होऊन शून्य होतो. या वेग बदलातील दरालाच त्वरण म्हणतात.

2) फुटबॉलच्या मैदानावर सरळ जात असणाऱ्या चेंडूची दिशा कशी बदलते ? एखादा खेळाडू तो चेंडू पायाने ढकलून त्याची दिशा बदलताना आपण पाहतो. दिशा बदलण्यामुळे चेंडूचा वेग बदलतो, म्हणजेच त्वरण घडते.

वेगातील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण म्हणतात. त्वरण वेगातील बदल / कालावधी त्वरण हि एक सदिश राशी आहे. SI / MKS पद्धतीत तिचे एकक m/s’ आहे.

हे करून पहा : कॅरमच्या सोंगटीला स्ट्रायकरने हळूच टिचकी मारा. कॅरमबोर्ड वर स्ट्रायकरने ढकललेली सोंगटी सुद्धा अशीच पुढे जाऊन थांबेल, कॅरमबोर्ड वर पावडर टाकून सोंगटी ढकलल्यास ती जास्त काळ पुढे जात राहील व नंतर थांबेल. यावरून काय लक्षात येते.

बल व त्वरण घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व सोंगटी थांबते. कॅरम बोर्ड व सोंगटी यांच्यातील घर्षण कमी केले, तर सोंगटी अधिक काळ चालत राहते. म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तू वर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील. I

न्यूटनचा गतिविषयक पहिला नियमः एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल, तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहील. तिला गती असेल, तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहील. बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणाने मोजले जाते.

कृती खालील कोणकोणत्या उदाहरणात विज्ञानाच्या दृष्टीने कार्य झाले आहे ते सांगा. 1) कौसर ही आपले गृहकार्य करते आहे, शाळेत दिलेला स्वाध्याय पूर्ण करते आहे. 2) समीर हा संगणकावर बसून आपल्या प्रोजेक्टचे काम करतो आहे. 3) सचिन मैदानात फुटबॉल खेळत आहे. 4) हमाल प्रवाशांचे जड़ सामान रिक्षा स्टॅन्ड वरून यस पर्यंत घेऊन जात आहे.

शास्त्रीयदृष्ट्या कौसर, समीर यांनी कार्य केले नाही. परंतु सचिन व हमाल यांनी कार्य केले आहे.

वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आहे असे म्हणता येते. कार्य हे बल व विस्थापनावर अवलंबून असते.

बनाने केलेले कार्य (W) = वस्तूला लावलेले बल (F) X बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन (s)

सूत्र- W=FxS

SI पद्धतीत कार्याचे एकक ज्यूल (J) तर बलाचे एकक न्यूटन (N) आणि विस्थापनाचे एकक मीटर (m) आहे.

CGS पद्धतीत कार्याचे एकक अर्ग (erg) आहे.

3. एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा.

उत्तर : ………………………………………….

4. एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो. त्याची सरासरी चाल व सरासरी वेग किती असेल?

उत्तर : ………………………………………….

5. एका विद्यार्थ्याने एका टेबलावर 25N इतके बल लावले असता, त्या टेबलाचे 3 मीटर इतके विस्थापन झाले, तर त्या विद्यार्थ्याने किती कार्य केले?

उत्तर : ………………………………………….

6. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा.

उत्तर : ………………………………………….


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराखालील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी  इयत्ता सातवीच्या  भूगोल पुस्तकातील पृथ्वीचे अंतरंग हा धडा वाचावा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1) शिलावरण कशाचे बनलेले आहे?

उत्तर : ………………………………………….

2) खडक म्हणजे काय?

उत्तर : ………………………………………….

3) अग्निजन्य खडकांचे वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर : ………………………………………….

4) रूपांतरित खडकांचे वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर : ………………………………………….

5) अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक यातील फरक लिहा

उत्तर : ………………………………………….

“पाणी आडवा, पाणी जिरवा” याविषयी माहिती मिळवा व वहीत लिहा 


चित्र देखकर नाम बताएं  और प्रश्नों के उत्तर लिखिए

१ व्यक्ति का नाम क्या है ?

जवाब :- …………………….

२ फल कहाँ पर लगते हैं?

जवाब :- …………………….

३ उछलकूद करने वाला ..

जवाब :- …………………….

४ लोगों के चेहरे का भाव

जवाब :- …………………….

५ भारत की राजधानी कौन-सी है ?

जवाब :- …………………….

निम्नलिखित  संज्ञा उचित   तालिका में लिखिए