इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 19
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
प्रश्नचिन्हाचा लेखनात वापर
प्रश्नार्थक प्रश्न चिन्हांचा वापर असलेली) वाक्यांचे क्रमांक लिहा
1)काल पाऊस पडला?
2) जंगलाला आग लागली तेव्हा तो जंगलात होता.
3) तू बाजारात गेला होता.
4) मैनाला गणित विषय आवडतो?
5) जंगलाला आग लागली तेव्हा तो जंगलात होता?
6) तू बाजारात गेला होता?
7) काल पाऊस पडला.
8) मैनाला गणित विषय आवडतो.
विद्यार्थ्यांनीपुढील प्रसंगात ते कोणते वाक्य म्हणतील. ते वाक्य लिहा. लिहिताना योग्य विरामचिन्हाचा वापर करा.
1) तुमच्या मित्र/मैत्रिणीकडे घड्याळ आहे तुम्हाला त्याला/तिला वेळ विचारायची आहे. यासाठी तू कोणते वाक्य म्हणशील ते लिही.
2) तुझ्या मित्राकडे दोन पेन आहेत त्यापैकी एक पेन तुला घ्यायचा मागायचा आहे. तू त्याला कोणते वाक्य म्हणशील ते लिही.
( 3 ) तुझ्या मित्र-मैत्रिणीचा सर्वांत आवडता पदार्थ तुम्हाला माहिती करून घ्यायचा आहे तो पदार्थ माहित करून घेण्यासाठी तुम्ही त्याला कोणते वाक्य म्हणाल ते लिहा.

अ)तुम्हाला एका शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी प्रश्न तयार कर व लिही.
ब) कोणी,कधी,कुठे,कसे,कोणाबरोबर, कशासाठी, केव्हा या शब्दांचा वापर करून प्रश्न तयार करा.
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

खालील उदाहरणे सोडवा
१. सहलीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यास ७७५ रुपये फी ठरविण्यात आली. शाळेतील ४३ विद्यार्थ्यांनी सहलीची फी जमा केली. तर सहलीसाठी एकूण किती फी शाळेकडे जमा झाली ?

२. एका सर्वेक्षणासाठी प्रत्येक मुलाला २७ घरांना भेट द्यावयाची होती. प्रत्यक्षात १८९ मुलांनी गावाचे सर्वेक्षण केले. तर सर्व मुलांनी मिळून गावातील एकूण किती घरांचे सर्वेक्षण केले ?

विषय – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास
Read and write.वाचा आणि लिहा

Make meaningful words. अर्थपूर्ण शब्द तयार करा
1. S O R E – ………..
2. O G D – …………
विषय – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

व्यंकोजीराजांची भेट : हा पाठयांश शिवछत्रपती ( परिसर अभ्यास भाग -२) या पाठ्यपुस्तकात पान क्र. ६१,६२ वर आहे.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१) शिवरायांना गोवळकोंडा येथे भेटीचे आमंत्रण कोणी दिले?
उत्तर : ………………………………………….
२) शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
उत्तर : ………………………………………….
३) व्यंकोजीराजे यांच्याकडे कुठली जहागीर होती ?
उत्तर : ………………………………………….
या प्रश्नांची उत्तरे शोधू
१) शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली ?
उत्तर : ………………………………………….
२) शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले ?
उत्तर : ………………………………………….
३) शिवरायांचे निधन केव्हा झाले?
उत्तर : ………………………………………….
उपक्रम
शिवराय व व्यंकोजीराजे यांच्या भेटीचे संवाद तयार कर.
उत्तर : ………………………………………….
………………………………………….
………………………………………….
………………………………………….
………………………………………….
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
I am really loving the theme/design of your website. Do you ever run into any web
browser compatibility issues? A handful of my blog audience have complkained about mmy blog not operating correctly in Explorer but looks great in Opera.
Do you hav any tips to help fix this problem? https://glassi-india.Mystrikingly.com/