इ 4 थी सेतू अभ्यास दिवस 14
विषय – मराठी
म्हणी व वाक्यप्रचार
खालील म्हणी वाचा व आपल्या वहीत लिहा
1 | अगं अगं म्हशी मला कोठे नेशी | स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. |
2 | आपला हात जगन्नाथ | आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. |
3 | अति तेथे माती | कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. |
4 | आयत्या बिळात नागोबा | दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. |
5 | आईजीच्या जीवावर बाईजी उदार | दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. |
6 | आपल्याच पोळीवर तूप ओढणे | फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे. |
7 | आंधळे दळते कुत्रं पीठ खाते | एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा. |
8 | आधी पोटोबा मग विठ्ठोबा | आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. |
9 | अडला हरी गाढवाचे पाय धरी | एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. |
10 | आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे | अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. |
खालील वाक्यप्रचार वाचा व आपल्या वहीत लिहा
अवहेलना करणे – अपमान करणे, अनादर करणे.
वाक्य – चांगल्या माणसाचा अवहेलना करू नये.
अहोरात्र झटणे – रात्रंदिवस कष्ट करणे.
वाक्य – शेतकरी मातीतून पीकरूपी सोने पिकवण्यासाठी अहोरात्र झटत असतो.
अपशकुन मानणे – प्रतिकूल घडण्याचा संकेत मिळणे, वाईट शंका येणे.
वाक्य – आताच्या विज्ञाननिष्ठ जगात ‘ अपशकुन मानणे ‘ ह्या सारखी अंधश्रद्धा जोपासणे चुकीचे आहे.
अवलंब करणे – अंगीकारणे, स्वीकारणे.
वाक्य – गुरुजींनी दिलेल्या ज्ञानाचा सईने वेळेत अवलंब केला.
अमर होणे – चिरकाल नाव राहणे.
वाक्य – जे सैनिक देशासाठी लढून मृत्यू पावले, ते वीर अमर झाले.
अजरामर होणे – कायम स्मरणात राहणे.
वाक्य – ज्या वीर सैनिकांनी देशासाठी आपले प्राणार्पण केले, ते अजरामर झाले.
अचूक वेध घेणे – न चुकता नेम साधणे.
वाक्य – नेमबाज अभिनव बिंद्रा ने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
अमलात आणणे – कारवाई करणे.
वाक्य – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बरेच नियम अमलात आणले.
म्हणी व वाक्प्रचार वापरून आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयावर / कथेवर किमान १० ओळी लिहा.
विषय – गणित

खालील उदाहरण समजावून घ्या



करून बघ.
रमेशकडे २०१ पुस्तके आहेत त्यातील ४९ पुस्तके उस्मान व ४० पुस्तके जॉन घेऊन होला. आता रमेशवले किती पुस्तके शिल्लक राहिली ?
विषय – इंग्रजी
कविता लक्षपूर्वक ऐक व त्याखाली असणारे प्रश्न आपल्या वहीत
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

खालील यमक जुळणारे शब्द आपल्या वहीत लिहा
seed * sow * pot * wish * that * sun * shower * while
उदा. seed – need, feed,
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका १३
संदर्भ : इयत्ता 3 री, पाठ-13. आपला आहार.

विषय – परिसर अभ्यास
खालील प्रश्न हे १६. दिवस आणि रात्र या पाठातील आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पाठाचा अभ्यास करून खालील प्रश्न सोडवावेत
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
उत्तर : ………………………………………….
२. तुम्ही संध्याकाळी किती वाजता झोपता?
उत्तर : ………………………………………….
३. तुम्हाला दिवस आवडतो की रात्र?
उत्तर : ………………………………………….
4 खालील चित्राचे निरीक्षण कर.

5 दिवस आहे असे केव्हा म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
6 रात्र आहे असे केव्हा म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
7 पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो?
उत्तर : ………………………………………….
8. अमावास्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे काय कारण असेल बरे!
उत्तर : ………………………………………….