इ 3 री सेतू अभ्यास दिवस 14
विषय – मराठी
विरामचिन्ह ,पूर्णविराम ,प्रश्नचिन्ह
खालील माहिती वाचा व समजून घ्या
गुणेश सकाळी लवकर उठला.
हे वाक्य उठला या शब्दानंतर संपले म्हणून आपण त्या नंतर (.) असे चिन्ह लिहतो. त्याला पूर्णविराम असे म्हणतात हे मुलांच्या लक्षात आणून देतील आणखी दोन तीन वाक्ये देवून पूर्णविरामाची ओळख करून द्यावी. त्यानंतर अशाच पदधतीने प्रश्नचिन्हाची ओळख करून द्यावी. आपण प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नचिन्ह (?) देतो हे काही उदा देवून लक्षात आणून द्यावे नंतर
प्रश्नचिन्ह किंवा पूर्णविराम यापैकी योग्य विरामचिन्हे
1. तुझे नाव काय
2. माझे बाबा बाबा हॉलीबॉल खेळतात

खालील उदाहरणे सोडवा
1 आईने कविताला डब्यात ठेवण्यासाठी २६ लाडू दिले. ताईने पुन्हा १२ लाडू दिले, तर कविताने एकूण किती लाडू डब्यात ठेवले ?
2 गोष्टीच्या पुस्तकातील ३०० पाने गौतमने काल वाचली. आज त्याने उरलेली ४९ पाने वाचली, तर ते पुस्तक किती पानांचे होते ?
3. माईकडे १८ टिकल्या होत्या. सीमाकडे २१ टिकल्या होत्या, तर दोघींकडे मिळून एकूण किती टिकल्या होत्या ?
4. टोपलीत ३३ जांभळे होती. शाहिदने त्यात ५४ करवंदे ठेवली, आता टोपलीत एकूण किती फळे झाली ?
5 खेळण्याच्या दुकानातील बाहुल्यांपैकी ४२ बाहुल्या गीताने घेतल्या. दुकानात अजून ३७ बाहुल्या शिल्लक होत्या, तर दुकानात एकूण किती बाहुल्या होत्या ?
विषय – इंग्रजी
name the shape in the pictures
खालील आकृती आपल्या वहीत काढा व त्यांना आकृत्यांना नावे द्या

विषय – परिसर अभ्यास
९ पाणी नक्की येते कोठून?पाठावर आधारित खालील प्रश्न आहेत
सांगा पाहू !
१. नळाला येणारे पाणी कोठून येते?
२. पाणी कशाकशात साठविले जाते?
३. तलाव व नदी यात पाणी कशामुळे साठते?
4 खालील चित्रात रंग भर.

5. पाणी कोठून कोठून मिळते ते लिहा?
6 . तुमच्या घरी पाणी कोठून आणतात?
7 . तलाव झरे यांना पाणी काश पासून मिळते?
8. पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल?
9. पाणी साठवण्याच्या साधनांची नावे लिहा ?
10. पाऊस पडलाच नाही तर काय होईल?
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका १३
संदर्भ : इयत्ता दुसरीच्या खेळू, करु, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ. क्र. ५८, ६८
सराव करू या :
१) तुम्हाला माहीत असलेल्या फुलांची यादी करा.
२) तुमचे आवडते फूल कोणते?
३) कोणत्याही एका फुलाचे चित्र काढा आणि त्यात रंग भरा.
४) परिसरातील फुले आणि पाने यांचा उपयोग करून पुष्पगुच्छ तयार करा.