इ 4 थी सेतू अभ्यास दिवस १३
विषय – मराठी
एका शब्दातील अक्षरावरून अनेक शब्द तयार करणे
उदा. ‘वातावरण’ या शब्दामधील अक्षरे घेऊन
वार, वरण, वाण, रण, वर, ताव वगैरे शब्द तयार होतात.
अशा प्रकारे खालील शब्दाचा अक्षरावरून अनेक शब्द तयार करा
दरवाजा
लेखन
कपाट
मेहनत
विषय – गणित

खालील बेरजेचे उदाहरण समजावून घ्या



माझ्या गावात ३२९ गाई, ४५७ म्हशी आणि २७६ बकऱ्या आहेत तर माझ्या गावात किती जनावरे आहेत ?
विषय – इंग्रजी
खालील चित्र पहा नंतर डोळे बंद करून त्याची नावे इंग्रजीमध्ये आपल्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न करा व नंतर आपल्या वहीत लिहा

विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका १2
खालील कृती पत्रिकेतील प्रश्न हे इयत्ता 3री, पाठ-13. आपला आहार या पाठातील आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पाठाचा अभ्यास करून खालील प्रश्न सोडवावेत
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
1. चूक की बरोबर ते लिहा.
अ) प्रत्येक व्यक्तीचा आहार सारखा असतो……………….
ब) मुलींना मुलांपेक्षा कमी आहाराची गरज असते. …………….
क) आजी आजोबांचा आहार हलका व पौष्टिक असावा. …………….

विषय – परिसर अभ्यास
खालील प्रश्न हे १६. दिवस आणि रात्र या पाठातील आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पाठाचा अभ्यास करून खालील प्रश्न सोडवावेत
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१. तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
उत्तर : ………………………………………….
२. तुम्ही संध्याकाळी किती वाजता झोपता?
उत्तर : ………………………………………….
३. तुम्हाला दिवस आवडतो की रात्र?
उत्तर : ………………………………………….
4 खालील चित्राचे निरीक्षण कर.

5 दिवस आहे असे केव्हा म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
6 रात्र आहे असे केव्हा म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
7 पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो?
उत्तर : ………………………………………….
8. अमावास्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे काय कारण असेल बरे!
उत्तर : ………………………………………….