[ad_1]
वाचाः करोनाविरोधात जग ‘या’ टेक्नोलॉजीचा वापर करतेय
या दोघांसाठी अनेक मोठी मंडळी पुढे येऊन भांडताना दिसताहेत. फेसबुक – इन्स्टाग्रामवर याचे अनेक मिम्स पाहायला मिळत असून, यात अनेक टिकटॉकर्सची खिल्ली उडवली जात आहे. युट्यूबर्सच्या मते टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात क्रिन्ज कंटेंट पाहायला मिळतं. यातील बऱ्याच व्हिडीओ ३० सेकंदांचे असल्यानं व्हिडीओ बनवून पोस्ट करणं अगदी सोपं आहे. यासाठी फक्त एका स्मार्टफोनची आवश्यकता असते. तसंच यात फक्त लिप्सिंग करायची असल्यानं यावर व्हिडीओज बनवून पोस्ट करणं अगदी सोपं असतं. तर टिकटॉकर्सचं म्हणणं असं, की आम्ही अगदी काही सेकंदांत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. म्हणून आम्हाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीतील एका युट्यूबरनं मुंबईतील एका टिकटॉकरला आपल्या व्हिडिओत रोस्ट केलं असून, त्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.
वाचाः National Technology Day: करोना विरोधात लढण्यास तंत्रज्ञानाची मोठी मदत : मोदी
त्याच्या या व्हिडीओला अवघ्या २४ तासांत ३ कोटींहून अधिक व्ह्यूज, ६७ लाखांहून अधिक लाइक्स तर ५.५ लाखाहून अधिक कमेंटस मिळाल्या आहेत. ६७ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्यानं युट्यूब इंडियावरील सर्वाधिक लाइक्स पटकवण्याचा मान या व्हिडीओला मिळाला आहे. तसंच ट्विटर इंडियावर ट्रेंडिंग लिस्टवर तो टॉप पोझिशनवर ट्रेंड होत होता. एकमेकांना रोस्ट करणं – एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं हे काही नवीन नाही. त्यामुळे युट्यूबर्सनी रोस्ट केल्यानंतर आता यावर टिकटॉकर्स कसा रिप्लाय देतात हे पाहणं नेटकऱ्यांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. या सगळ्यामागे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला आटापिटा असल्याची चर्चा आहे.
वाचाः …तर देशभरात स्वस्तात मिळणार करोना व्हायरसचे औषध
वाचाःलॉकडाऊनः जिओचा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान लाँच
वाचाः लॉकडाऊनमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?
वाचाः ‘रेडमी नोट ९ प्रो’च्या जाहीरातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी
[ad_2]
Source link