♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

जेवण केल्यावर किती वेळाने पाणी प्यावे ? ज्ञानवर्धक माहिती

पाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. इतकेच नाही तर त्वचाही तजेलदार आणि निरोगी राहते. दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे आवश्यक असते.

सदर ग्रुप मध्ये खालील इयत्ता शिकवणाऱ्याच शिक्षकांनी जॉईन होण्यासाठी

अन्न पचण्यासाठी हे मदत करते. जेवण करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर किंवा जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे.
स्वस्थ राहायचे असेल तर देवाने दिलेल्या या देणगीचा भरपूर वापर करा. पाणी पिल्याने पचनक्रिया योग्य पद्धतीने चालते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिल्याने पोट साफ राहते.

आयुर्वेदात जेवताना, जेवणानंतर किंवा जेवणा दरम्यान पाणी पिण्याला चुकीचे म्हटलेले नाही. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनानुसार जेव्हा तुम्हाला पाणी प्यावेसे वाटेल तेव्हा पाणी पिणे गरजेचे आहे मग, ते जेवणाआधी असो जेवणानंतर असो वा जेवणात दरम्यान!

आयुर्वेदानुसार साधारण जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हवे. कारण जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यामुळे पचन प्रक्रियेत बाधा निर्माण होते तसेच वजन वाढण्याची शक्यता आहे असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.

आयुर्वेदानुसार जेवणादरम्यान पाणी पिणे चुकीचे समजले जात नाही परंतु जेवताना अतिरिक्त पाणी पिण्याऐवजी थोडया प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे ज्यामुळे अन्नाचे मोठेमोठे तुकडे लहान व्हायला मदत होते ज्यामुळे त्यांचे पचन नीट होते.

जेवताना थंड पाणी पिऊ नये असे आयुर्वेदात सांगितले आहे. थंड पाणी शरीरातील आम्लांचे प्रमाण वाढवते आणि त्यामुळे पाचनप्रक्रियेत बाधा येऊ शकते असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे. ज्यामुळे ॲसिडीटी होऊ शकते.

थोडक्यात काय तर वरून आपल्या हे लक्षात येते की यापुढे जेवताना पाणी प्यावे की नाही प्यावे याचा विचार करायची गरज नाही फक्त ते प्रमाणात प्यायला हवे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.