[ad_1]
अज्ञात लोकांचे नंबर डिलिट करा
आपली कॉन्टक्ट यादी वेळोवेळी तपासून पाहा. अनेकदा आपल्या तात्पुरत्या कामांसाठी अज्ञात लोकांचे फोन नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करावे लागतात. जर तुम्हाला कधी तरी या नंबरची गरज पडत असेल तर त्या नंबरला व्हॉट्सअॅवर ब्लॉक करून ठेवा. असे केल्यास ज्यावेळी तुम्हाला अशा नंबरच आवश्यकता लागेल त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक करू शकाल. परंतु, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवर स्टेट ठेवल्यास त्या व्यक्तीला ते दिसणार नाही. तसेच या नंबरचा तुम्हाला व्हॉट्सअवर त्रास होणार नाही.
प्रोफाईल फोटोवर तुमचे गुपित उघड करू नका
व्हॉट्सअॅपवर आपला प्रोफाईल फोटो साधा ठेवणे कधीही चांगले आहे. प्रोफाईल फोटोतून तुमच्या कुटुंबाविषयीची अधिक माहिती उघड करु नका. कारण, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील असलेली व्यक्ती तुमचे व्हॉट्सअॅप प्रोफाईल फोटो पाहू शकते. कोण तुमचा प्रोफाईल फोटो पाहू शकतो. यासाठी तीन प्रायव्हसी पर्याय आहेत. या तीन पर्यायाचा अर्थ म्हणजे व्हॉट्सअॅप युजर्स तुमचे फोटो पाहू शकते. My Contacts (कॉन्टॅकमधील लोक) आणि Nobody आहे. व्हॉट्सअॅपमध्ये काही निवडक कॉन्टॅक्टपासून प्रोफाईल फोटो लपवून ठेवण्याचा कोणताही पर्याय नाही.
सर्व लोकांसोबत शेअर करू नका आपला स्टेट्स
स्टेट्स मेसेज खासगी असतात. हे केवळ आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांसाठी असतात. या स्टेट्सला प्रत्येकांसाठी शेअर करू नका. तसेच आपल्या अकाउंट्सला सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रू स्टेप ऑथेंटिकला अॅड करणे चुकवू नका. हे तुम्हाला सिम स्वॅप फ्रॉडपासून सुद्धा बचाव करेल. त्यामुळे तुम्हाला तुमचे स्टेट्स कसे ठेवायचे, तुम्हाला तुमची खासगी माहिती सर्वांना सांगायची आहे की केवळ आपल्या परिचयातील लोकांना सांगायची आहे, हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.
प्रत्येकाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्याची परवानगी देऊ नका
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोण तुम्हाला अॅड करतो. यासाठी मेसेजिंग अॅपमध्ये पर्याय दिले आहेत. प्रायव्हेसी सेटिंग्स मध्ये Everyone (प्रत्येक जण, कोणीही ग्रुप्समध्ये जोडू शकतो) My Contacts (तुमच्या कॉन्टॅक्टमधील लोक) तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडू शकतात. यासाठी हे ऑप्शन दिले आहेत. प्रत्येक जण तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू देण्याचा ऑप्शन ठेवायचा की तुमच्या फोनमधील केवळ तुमच्या मित्रांना ही परवानगी द्यायचीय, हे तुम्ही ठरवायचे आहे.
चुकूनही शेअर करू नका पॉर्न क्लिप
पॉर्न क्लिप किंवा हिडन व्हिडिओ क्लिप चुकूनही व्हॉट्सअॅपवर शेअर करू नका. असे तुम्ही केल्यास ते तुम्हाला जेलची हवा खाण्यासाठी पाठवले जाईल. तसेच संवेदनशील प्रकरणी कोणीही अफवा पसरवू नका. कोणत्याही दुसऱ्याच्या नावावर व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करु नका किंवा ते चालवू नका. असे केल्यास हे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. इंटरनेटवर पॉर्न क्लिप पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही. बऱ्याचदा मित्राला एखादा व्हिडिओ पाठवण्याची चूक अनेक जण करतात. परंतू, व्हॉट्सअॅपवरून पॉर्न क्लिप पाठवल्यास ते तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते.
[ad_2]
Source link