♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

खोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचं खरं काम वेगळंच आहे!

खोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचं खरं काम वेगळंच आहे!

      लहान असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे खोडरबर वापरत  असतो.  खोडरबरचा सामान्यता उपयोग पेन्सिलने लिहिलेले खोडण्यासाठी होतो. परंतु लाल आणि निळा रंगाचा खोडरबर शाळेत गेलेल्या प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच वापरला असेल.

.   पांढरा खोडरबर हा पेन्सिल  लिहिलेले  खोडण्यासाठी असतो असा आपला सामान्यता समज आहे. त्यामुळे  असा लाल किंवा निळा बरोबर आपल्या समोर आला की आपल्याला असे  वाटते की हा निळा खोडरबर म्हणजे पेन ने लिहिलेले खोडण्यासाठी आहे.

पण खरं सांगायचं तर हा आपला गैरसमज होता. काही जण अजूनही असं मानतात की या खोडरबरने पेनाची शाई खोडता येते. 

मुळात त्यात त्यांचीही काही चूक नाही म्हणा, कारण या या लाल-निळ्या खोडरबरच्या लाल भागावर पेन्सिलची आकृती दिसते, त्यामुळे त्याचा वापर पेन्सिलने लिहिलेलं खोडण्यासाठी होतो हे बरोबर.

आणि या खोडरबरच्या निळ्या भागावार मात्र पेनासारखी आकृती दिसते त्यामुळे आपण असा समज करून घेतो की हा भाग पेनाने लिहिलेलं खोडण्यासाठी आहे की काय?

हा समज प्रत्येकाच्या मनात निर्माण होतोच आणि त्या पायी पेनाची शाई खोडताना कागद मात्र फाटला जातो आणि आपल्या लक्षात येतं की आपला समज हा एक गैरसमज होता.

चला तर जाणून घेऊया या निळ्या भागाचा नेमका वापर काय?

या निळ्या भागाचा वापर केवळ पेन्सिलच्या माध्यमातून कागदावर उमटलेले गडद लिखाण किंवा लिहिताना झालेली एखादी चूक/खुण खोडण्यासाठीच केला जातो. म्हणजे या खोडरबरचा वापर हा फक्त पेन्सिलचे लिखाण खोडण्यासाठीच होतो, पेनाचे नाही हे लक्षात घ्या.

मग तुम्ही म्हणाल दोन रंग देण्याचा काय फायदा? तर या दोन रंगातील फरक असा आहे की

लाल भागाचा वापर हा पातळ कागदावरील पेन्सिलचे लिखाण खोडण्यासाठी होतो आणि

निळ्या भागाचा वापर जाड कागदावरील पेन्सिलचे लिखाण खोडण्यासाठी होतो.

जर तुम्ही पातळ कागदावरील लिखाण खोडण्यासाठी निळ्या भागाचा वापर केला तर ज्या ठिकाणी तुम्ही खोडण्याचा प्रयत्न करत आहात तो कागदाचा भाग फाटू शकतो. विश्वास नसेल तर एकदा ट्राय करून बघा.

याच विरुद्ध जर तुम्ही एखाद्या जाड कागदावर/ आर्ट पेपरवर लाल भागाचा वापर खोडण्यासाठी केला तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जे लिखाण तुम्ही खोडू इच्छिता आहात ते सहसा मिटणार नाही. याच ऐवजी जर तुम्ही निळ्या भागाचा वापर केला तर मात्र ते लिखाण सहज खोडले जाईल.

काय? मिळाली का नाही छान माहिती? आणि दूर झाला की नाही गैरसमज? मग आता हा लेख शक्य तितका शेअर करा इतरांचाही या लाल-निळ्या खोडरबरच्या बाबतीतला गैरसमज दूर करण्यास मदत करा.

सदर ग्रुप मध्ये खालील इयत्ता शिकवणाऱ्याच शिक्षकांनी जॉईन व्हावे. या ग्रुप मध्ये इयत्तेला, विद्यार्थ्यांना आवश्यक अशा उपयुक्त 

  • ✅शैक्षणिक साहित्य 
  • ✅घरचा अभ्यास
  • ✅ऑनलाइन टेस्ट
  • ✅निबंध
  • ✅गोष्टी, बोधकथा
  • ✅मनोरंजक अभ्यास
  • ✅सामान्य ज्ञान टेस्ट 
  • ✅भाषणे 

यासारखा कंटेंट शेअर केला जाणार आहे.

जॉईन होण्यासाठी खालील इयत्ते समोरील येथे क्लिक करा वर क्लिक करा.

इयत्ताग्रुप जॉईन करण्यासाठी
इयत्ता १ लीयेथे क्लिक करा
इयत्ता २ रीयेथे क्लिक करा
इयत्ता ३ रीयेथे क्लिक करा
इयत्ता ४ थीयेथे क्लिक करा
इयत्ता ५ वीयेथे क्लिक करा
इयत्ता ६ वीयेथे क्लिक करा
इयत्ता ७ वीयेथे क्लिक करा
इयत्ता ८ वीयेथे क्लिक करा
इयत्ता ९ वीयेथे क्लिक करा
इयत्ता १० वीयेथे क्लिक करा