Triple Camera Smartphones: १० हजार रुपये कमी किंमतीतील ३ रियर कॅमेऱ्याचे खास स्मार्टफोन – best triple rear camera smartphones under rupees 10000 in india

[ad_1]

बजेट स्मार्टफोन सेगमेंटची स्पर्धा खूप वाढली आहे. सर्वच कंपन्या आता कमी किंमतीत आपले बेस्ट स्मार्टफोन लाँच करीत आहेत. तर, दुसरीकडे या सेगमेंटमध्ये जबरदस्त कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची संख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. सध्याच्या घडीला सेगमेंटमध्ये अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ज्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. स्वस्त अन् मस्त स्मार्टफोनच्या ग्राहकांची संख्या भारतात खूप मोठी आहे. कमी किंमतीत स्मार्टफोनमध्ये चांगले फीचर्स, कॅमेरा, दमदार बॅटरी ग्राहकांना हवी असते. अनेक जण स्मार्टफोन खरेदी करताना मोबाइलमध्ये कॅमेरी किती व कसा दिला आहे, याची बारकाईने चौकशी करतात. त्यानंतर फोन खरेदी करतात. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील टॉप ५ स्मार्टफोन आहेत. हे फोन तुमची फोटोग्राफी वाढवण्यास मदत करतील, जाणून घ्या या फोनविषयी….

​मोटो G8 पॉवर लाइट

maharashtra times

मोटोरोलाचा हा सर्वात लेटेस्ट स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला असून २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनची विक्री २९ मे पासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. Moto G8 Power Lite मध्ये कंपनीने रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 5000mAh मोठी बॅटरी दिली आहे.

​रियलमी नार्जो 10A

maharashtra times

३ जीबी रॅम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 5000mAh ७ क्षमतेची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत ८,४९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट तसेच रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवरून २२ मे पासू दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

​विवो Y12 64 जीबी

maharashtra times

विवोच्या या स्मार्टफोनची किंमत ९ हजार ९९० रुपये आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये कॅमेरा टाइम-लेप्स, लाइव्ह फोटोज, एचडीआर, पोर्टेट मोड, पॅनोरमा आणि सुपर वाइड अँगल कॅमेरा यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच या फोनमध्ये मीडियाटेक पी२२ प्रोसेसर दिला आहे.

​मोटोरोला वन मायक्रो

maharashtra times

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल प्लस, २ मेगापिक्सल प्लस २ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ६.२ इंचाच्या एचडी प्लस मॅक्स व्हिजन प्लस डिस्प्ले, फोटोसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेट अप दिला आहे. १३ एमपी प्रायमरी सेन्सरसह २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. खास फोटो यावे यासाठी ऑटोफोकस मॉड्यूस दिला आहे.

​विवो U10

maharashtra times

३ जीबी रॅम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. या फोनची किंमत ९ हजार ९९० रुपये आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम दिला असला तरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतो. या फोनमध्ये ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

[ad_2]

Source link

Leave a comment