DD Sahyadri Live
डी.डी. सह्याद्री वाहिनीद्वारे ‘ज्ञानगंगा” या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिनांक १४ जून २०२१ पासून tili mili program in marathi दैनिक ५ तासांकरीता सुरु करण्यात आले आले. शासनाच्या याच उपक्रमाला सहयोग देण्यासाठी,व अशा अपवादात्मक परिस्थितीत ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे पुनर्प्रक्षेपण मोफत देण्याचे ठरविले आहे. मागील शैक्षणिक वर्षात “ टिलीमिली ” tili mili program ही मालिका विद्यार्थ्यान मध्ये अत्यंत लोकप्रिय झाली.
घरातील सह्याद्री दूरदर्शन चैनल वर “ टिलीमिली ” tili mili program ही मालिका महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना tili mili program live पाहता येणार आहे आहे. ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित आहे.
dd sahyadri tili mili program
त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत. मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव घेऊ दिले गेले आहेत, त्यांच्याभोवती छोट्याछोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाईल, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असेल .मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल. अशी सहज,आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना ही मालिका रोज स्वत: शिकण्याची स्फूर्ती देईल.
टिलीमिली कार्यक्रमाचे वेळापत्रक tilimili time table 2021 tili mili time table 2021

🤞🤞 Tilly milly