♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

third party facebook : फेसबुकवरील ‘थर्ड पार्टी अॅप्स’ म्हणजे थोडी गंमत, मोठा धोका – beware of third party facebook application security risks

[ad_1]

उत्कर्ष जोशी

तुम्ही अमुक सेलिब्रिटीसारखे दिसता, तुमचं लग्न अमुक वर्षी होईल, तुम्ही गेल्या जन्मी अमुक साम्राज्याचे राजे होता…या आणि अशा अनेक पोस्ट तुम्हाला तुमच्या मित्रांच्या फेसबुक वॉलवर दिसल्या असतील. हा ट्रेंड सुरू आहे, तर आपणही तसं करू या इच्छेपोटी तुम्ही त्या अॅप्सवर जात असाल. नेहमीप्रमाणे अॅपकडून अगदी नम्रपणे तुमच्या प्रोफाइलचा अॅक्सेस मागितला जातो. आणि तुम्हीही खुशीनं तो देऊन मोकळे होता. मग एखाद्या कुंडलीप्रमाणे तुमच्या प्रोफाइलचा अभ्यास केला जातो आणि समोर येतो एक निष्कर्ष. तुम्हाला गंमत वाटते आणि तुम्ही तो निष्कर्ष आपल्या वॉलवर अपलोड करता आणि नंतर सगळं विसरता. पण, ते अॅप मात्र त्याचं मुख्य काम सुरू करतं, डेटा फिशिंगचं.

कसा होतो माहितीचा वापर?

माझ्या वॉलवर अशी कुठली गोपनीय गोष्ट आहे जी चोरी झाली तर माझं नुकसान होईल, या भ्रमात आपण निश्चिंत असतो. मात्र ही ‘थर्ड पार्टी’ अॅप तुमची माहिती बेमालूमपणे तुमच्याचसाठी वापरतील. त्यातून मग आपण कुठेतरी चॅटमध्ये कुणाकडे आपला शॉपिंगचा मनसुबा उघड करतो. आणि काही दिवसांनी तुमच्या वॉलवर जाहिराती येऊ लागतात. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत तुमची मतं समजून घेऊन, जाणूनबुजून तुमच्या मतांना पुष्टी देणारी माहिती, लेख, फोटो, व्हिडीओ तुमच्यासमोर आणले जातात.

मोठा प्रभाव

वरकरणी निरुपद्रवी वाटणारी ही थर्ड पार्टी अॅप फेसबुकवर खूप मोठा प्रभाव पाडत असतात. तुमची माहिती जाहिरातींसाठी, सर्वेक्षणासाठी, किंवा इतर काही मतलबांसाठी पद्धतशीरपणे विकली जाते. अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान हा प्रकार पहिल्यांदा उघडकीस आला आणि जगानं फेसबुकची गांभीर्यानं दखल घेतली. मात्र तरीही अशी अॅप सर्रास फेसबुकवर डेटा चोरी करत असतात आणि आपण त्यांना ते करण्याची परवानगीही दिलेली असते.

काय खबरदारी घ्यावी?

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ही अॅप्स अजिबात वापरू नयेत. कारण यातून केवळ तुमचीच नाही, तर तुमच्या मित्रांचीही माहिती जगासमोर येऊ शकते. एकदा प्रोफाइलमध्ये शिरलेली ही अॅप्स जोवर तुम्ही बंद करत नाही तोवर माहिती संकलन चालूच ठेवतात.

कशी बंद करायची?

– फेसबुकवर लॉग इन करून सेटिंग्जमध्ये जा.

– डाव्या बाजूस ‘इन्स्टंट गेम्स’वर जाऊन त्यात दिसणारी सर्व अॅप्स सिलेक्ट करा.

– ‘रिमूव्ह’वर क्लिक करा.

– ‘Delete all posts from account’ हा पर्याय निवडा आणि त्या सर्व पोस्ट डिलिट करून टाका.

फेसबुक प्रोफाइलवरील तुमची माहिती आणि त्या अॅप्सवर येणारे निष्कर्ष यांचा तीळमात्रही संबंध नसतो. उत्सुकता म्हणून आपण काहीतरी करतो, मात्र त्यातून आपणच आपली माहिती चोरांच्या हातात सोपवत असतो. लॉकडाऊनमुळे फेसबुकवर लोक घालवत असलेला वेळ कमालीचा वाढत असल्यानं माहिती चोरणाऱ्या अॅप्सना उधाण आलंय. जबाबदार इंटरनेट युजर म्हणून आपण या जाळ्यात अडकू नये.

– तुषार भगत (रिस्पॉन्सिबल नेटीझन)[ad_2]

Source link