‘टीईटी’तील नऊ प्रश्‍न केले रद्द tet exam

tet exam

आठ वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती नव्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागेल, या आशेने नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी tet exam राज्यातून तीन लाख 43 हजार विद्यार्थी बसले. मात्र, या tet exam प्रश्नपत्रिकेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना उत्तर लिहता आले नाहीत. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी तब्बल 45 तज्ज्ञांची नियुक्‍ती करुन अंतिम उत्तरसूची तयार करण्यात आली. दरम्यान, या tet exam मधील पेपर एकचे सहा तर पेपर दोनचे तीन प्रश्‍न रद्द करण्याचा निर्णय तज्ज्ञांनी घेतला आहे.


ठळक बाबी…

tet exam

  •  टीईटी परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेतील त्रुटी पडताळणीसाठी 45 तज्ज्ञांची नियुक्‍ती
    परीक्षेतील 150 प्रश्‍नांपैकी नऊ प्रश्‍न रद्दचा निर्णय : विद्यार्थ्यांकडून मागविले आक्षेप
    राज्यातून सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी नोंदवले आक्षेप : अंतिम उत्तरसूची तयार
    गुण वाढवून द्यायचे की प्रश्‍नच रद्द करायचा, तज्ज्ञ घेणार निर्णय


डीटीएड व बीएड, बीपीएड पूर्ण करुनही शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील भावी गुरुजींनी स्वप्नपूर्तीसाठी टीईटीची परीक्षा दिली. मात्र, त्या प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे त्यांची चिंता वाढली आणि काहींनी अंदाजे उत्तर लिहीले तर काहींनी उत्तरच लिहीले नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्रत्येक विषयांतील त्रुटी पडताळणीसाठी किमान चार तज्ज्ञ नियुक्‍त करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून अंतिम उत्तरसूची तयार करुन त्यावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले असून 20 फेब्रुवारीपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्रुटी असलेले प्रश्‍न वगळून उर्वरित गुणावरुन निकाल जाहीर केला जाणार आहे. 15 मार्चपूर्वी टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होईल, असे नियोजन शिक्षण परिषदेने केले आहे.


शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रश्‍नपत्रिकांमधील चुकीच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी विषयनिहाय चार तज्ज्ञ नियुक्‍त केले. अंतिम उत्तरसूची तयार करुन विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविण्यात आले असून 15 मार्चपूर्वी परीक्षेचा निकाल जाहीर होईल. अर्थबोध न होणाऱ्या प्रश्‍नाला गुण दिले जातील, याचा निर्णय तज्ज्ञ घेतील.
– तुकाराम सुपे, आयुक्‍त, शिक्षण परिषद, पुणे

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

Leave a comment