[ad_1]
Tecno Spark 5 ची किंमत
कंपनीने या स्मार्टफोनची किंमत ९ हजार ३०० रुपये ठेवली आहे. या स्मार्टफोनला ब्लू, ग्रीन, ब्लॅक आणि ऑरेंज या रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनची प्री बुकिंग करता येऊ शकणार आहे. या स्मार्टफोनचा सेल कधी सुरू होणार आहे, यासंबंधीची माहिती कंपनीने अद्याप दिली नाही.
वाचाः वैज्ञानिकांनी शोधली अँटीबॉडी; ‘करोना’ला रोखणार
Tecno Spark 5 ची वैशिष्ट्ये
टेक्नो स्पार्क ५ मध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन ७२० x १६०० पिक्सल आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबीचा स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारीत HiOS 6.1 वर काम करतो. तसेच या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप (चार कॅमेरे) ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमधील चौथ्या सेन्सरची माहिती मिळाली नाही. या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
वाचाःस्वस्त अन् मस्तः १२८ जीबी स्टोरेजचे ‘टॉप-५’ स्मार्टफोन
Tecno Spark 5 ची बॅटरी
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट यासारखे कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.
[ad_2]
Source link