♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

एअरटेल ग्राहकांना ‘गुड न्यूज’, ही सेवा १२ जुलैपर्यंत ‘फ्री’ – airtel offers free zee5 premium to all users until july 12

लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ पाहण्याची मागणी वाढल्याने एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांना एक गुड न्यूज दिली आहे. एअरटेलने एअरटेल थँक्सच्या सर्व ग्राहकांना Zee5 च्या प्रीमियमचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये दिले आहे. एअरटेलच्या ग्राहकांना ही सुविधा ४ मे पासून १२ जुलै २०२० पर्यंत मिळणार आहे. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना आता डबल आनंद मिळणार आहे.

एअरटेलचे युजर्स एअरटेल थँक्स अॅपमध्ये जाऊन झी५ (Zee5) च्या प्रीमियम सब्सक्रिप्शनला अॅक्टिवेट करू शकतात.

एअरटेलच्या सर्व युजर्संना झी५ ची सुविधा मिळणार आहे. ज्या ग्राहकांनी १४९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज केले असेल अशा सर्व ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे.

Zee5 इंडियाचे बिजनेस डेव्हलपमेंट आणि कमर्शियल हेड मनप्रीत बुमराह यांनी सांगितले की, Zee5 ने एअरटेलसोबत करार केला आहे. या करारामुळे आम्ही खूप आनंदी आहोत.

झी५ मनोरंजनचे विविध प्लॅटफॉर्म आणि १२ भाषेत कंटेट मिळणार आहे. आम्ही एअरटेलच्या माध्यमातून आणखी विस्तार करणार आहोत. आम्ही एकमेकांच्या क्षमतेना फायदा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भारती एअरटेलचे चिफ मार्केटिंग अधिकारी शाश्वत शर्मा यांनी सांगितले की, एअरटेल थँक्स आता भारताचा सर्वात मोठ्या रिवार्डपैकी एक आहे.

तसेच ग्राहकांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करीत आहे. थँक्स रिवार्डचा विस्तार करण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना उच्च गुणवत्ता प्रीमियम व्हिडिओ कंटेट उपलब्ध करण्यासाठी आम्ही झी५ सोबत करार केला असल्याने आनंदी आहोत, असेही ते म्हणाले.