[ad_1]
वाचाः१५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील ३२ इंचाचे जबरदस्त स्मार्ट टीव्ही
सोलर पॉवर बँकला बॅगपॅक अटॅच केले जाऊ शकते. आणि सायकलिंग, हायकिंग किंवा कॅम्पिंग करताना खूप मोठी मदत मिळणार आहे. याची किंमत ३४९ चिनी युआन म्हणजेच ३६०० रुपये ठेवण्यात आली आहे. YEUX सोलर मोबाइल पॉवर बँक हाय सेन्सिटिविटी, सिंगल क्रिस्टल सिलिकॉन सोलर पॅनेलचा वापर करते. जुन्या सोलर पॅनेल्सच्या तुलनेत याचा कन्वर्जन रेट खूप चांगला आहे. पाऊस पडल्यानंतरही तो चार्ज होऊ शकतो. जर कोणत्याही बॅगपॅकला अटॅच केल्यानंतर चालताना किंवा सायकलिंग करतानाही तो सहज चार्ज करता येऊ शकतो.
xiaomi launches new solar power bank
वाचाः सॅमसंगचे स्वस्तातील दोन फोन होताहेत लाँच, किंमत ९००० ₹
कमी उन्हात करणार काम
पॉवर बँकमध्ये देण्यात आलेल्या चार्जिंग बोर्डचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात सोलर चिप टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. याच्या मदतीने कमी ऊन असले तरी तो वेगाने चार्ज करता येऊ शकतो. यात ग्रीन लाईट म्हणजे खूप ऊन, यलो लाईट म्हणजे साधारणपणे आणि रेड लाईट म्हणजे कमी ऊन दर्शवते. सोलर चार्जरमध्ये ६४०० एमएएचची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. सोलर चार्जर या बॅटरीला कोणत्याही लाईटला रिचार्जवर ठेऊ शकता येते. पॉवर सप्लाय झाल्यानंतर बॅटरी थेट रिचार्ज करता येऊ शकते. हे थ्री आऊट इंटरफेस डिझाईनवर काम करते.
वॉटरप्रूफ असणार पॉवरबँक
पॉवर बँकेत दोन यूएसबी – ए इंटरफेस 5V/3A चे मॅक्झिमम आऊटपूट सोबत देण्यात आले आहे. एक टाईप सी इंटरफेस 5V/3A आऊटपूट सोबत देण्यात आले आहेत. याच्या मदतीने मोबाइल फोन, टॅबलेट्स, डिजिटल कॅमेरा, किंवा दुसरा पॉवर बँक आणि डिव्हाईस चार्ज करता येऊ शकतो. तसेच मायक्रो यूएसबी इनपूट इंटरफेस देण्यात आला आहे. जे जास्तीत जास्त 5V/2A इनपूट सपोर्ट करते. या पॉवर बँकेला इनक्रिप्टेड ऑक्सफर्ड क्लोथच्या मदतीने तयार केले आहे. हे वॉटरप्रूफ आहे.
वाचाः नोकियापासून शाओमीपर्यंत, ५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन
वाचाः जिओचा जबरदस्त प्लानः ७३० GB डेटा आणि १ वर्षांपर्यंत रिचार्जची सुट्टी
[ad_2]
Source link