snaptube: तात्काळ डिलीट करा हे खतरनाक मोबाइल अॅप – delete malicious android app snaptube with 300 millions of android users

[ad_1]

नवी दिल्लीः एका ताज्या रिपोर्टनुसार, खोट्या आणि मॅलिशस अॅप्स वरून युजर्संची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या घटना उघडकीस आली आहे. या रिपोर्टमधून एक अॅप हटवण्याची सूचना केली आहे. या अॅपला कोट्यवधी युजर्संनी डाऊनलोड केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे धोकादायक बनले आहे. या रिपोर्टमध्ये ज्या अॅपला युजर्संसाठी खतरनाक सांगितले आहे. ते अॅप Snaptube आहे.

वाचाः

जिओची जबरदस्त भेट, फ्री Hotstar आणि 240GB पर्यंत डेटाही

डिलीट करा ये खतरनाक अॅप
Snaptube हे एक प्रसिद्ध व्हिडिओ डाऊनलोड अॅप आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, डाऊनलोड झाल्यानंतर हे अॅप विना परवागनी युजर्संला प्रीमियम सर्विस साठी साईन अप करते. तसेच जाहिराती डाऊनलोड आणि क्लिक सुद्धा करीत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, गेल्या वर्षी ७ कोटी हून अधिक फ्रॉड ट्रान्झक्शन स्नॅपट्यूब वरून करण्यात आली होती. या वर्षी ३.२ ट्रान्झॅक्शन समोर आलेली आहे.

कोट्यवधी युजर्स
हे मोबाइल अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध नाही. हे यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सह सर्वच मोठ्या वेबसाइटवरून व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा मिळते. त्यामुळे गुगलवर उपलब्ध असलेल्या वेबसाइटवरून सर्च करुन डाऊनलोड करते. Snaptube ही स्वतः एक वेबसाइट आहे. या वेबसाइटच्या माहितीनुसार, अॅप जगभरात ३०० मिलियन (३० कोटी) हून अधिक जास्त युजर्स आहेत. ही हुवेईच्या अॅप गॅलरीवर सुद्धा उपलब्ध आहे.

वाचाःफेसबुकवर अशा जाहिरातींना चुकूनही क्लिक करू नका

स्थिती वाईट
Upstream च्या रिपोर्टनुसार, या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट मॅलिशस अँड्रॉयड अॅप्स समोर आले आहे. या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या दरम्यान एकूण ट्रान्झॅक्शन मधील ८९ टक्के फेक करण्यात आले आहे. पहिल्या तिमाहित मिळालेल्या टॉप १० खतरनाक अॅप्स मध्ये ९ गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध होते. तर गेल्यावर्षी अशा टॉप १०० अॅप्सपैकी ३० टक्के प्ले स्टोरवर मिळाले होते.

वाचाः नोकियाने आणला जबरदस्त स्मार्ट टीव्ही, पाहा किंमत

वाचाःMitron युजर्संना इशारा, तात्काळ डिलीट करा अॅप

[ad_2]

Source link

Leave a comment