♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस सातवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस सातवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

• शिक्षिकांनी विद्यार्थ्यांशी पुढील प्रश्नां संदर्भात चर्चा करावी.

१) तुम्हांला कोणकोणते खेळ आवडतात?

२) तुमचा सर्वात आवडता खेळ कोणता?

३) तुम्हांला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो? तो का आवडतो?

४) तुम्हांला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ? की दोन्ही? ते खेळ का आवडतात?

५ तुम्हांला माहित असलेल्या धावपटूंची नावे सांगा.

६) तुमच्या आवडत्या खेळाडूंची नावे सांगा.

७) तुमच्या आवडत्या खेळाडू विषयी माहिती सांगा.

शिक्षकांनी वरीलप्रमाणे विविध प्रश्न विचारून विद्यार्थी कितपत बोलतात हे जाणून घ्यावे.

सक्षम बनू या

• शिक्षकांनी ‘कविता राऊत’ या खेळाडूविषयी माहिती सांगावी.

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुलाखत कशी घ्यावी याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करावे. मुलाखतीचे तीन घटक असतात.

१) मुलाखत दाता :- असामान्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी, प्रश्नांना उत्तरं देणारी म्हणजे मुलाखत देणारी व्यक्ती.

२) मुलाखतकार:- प्रश्न

विचारणारी

म्हणजे

मुलाखत

घेणारी

व्यक्ती.

३) मुलाखतीचे वाचक :- प्रेक्षक व श्रोते.

– पूर्वतयारीत विषयाला समर्पक अशी प्रश्नावली तयार असावी.

~~ एका विद्यार्थ्याला कविता राऊत या खेळाडूची अभिरूप मुलाखत देण्यास सांगावे. • आपल्या आवडत्या खेळाडूची मुलाखत घेणे यासाठी विद्यार्थ्यांच्या जोड्या कराव्यात. तयारीसाठी १० मिनिटे वेळ द्यावा. नंतर मुलाखतीचे सादरीकरण घ्यावे

4 चला सराव करू या

• विद्यार्थ्यांना आपल्या मित्रमैत्रिणींची मुलाखत घेण्यास सांगावे.

+ कल्पक होऊ या•

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिसरात असलेल्या विविध व्यावसायिक, प्रसिद्ध व्यक्ती यांची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली करण्यास सांग

 विषय –  गणित 

प्रश्न 1) खाली सोडवून दाखविल्याप्रमाणे दिलेल्या संख्यांचे विभाजक लिही.

1) 10-1,2,5,10

2) 32

3) 14

प्रश्न 2) खाली सोडवून दाखविल्याप्रमाणे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. अ)5 ने विभाज्य असलेल्या तीन अंकी पाच संख्या लिह – 100, 105,200, 250,315

ब) 10 ने विभाज्य असलेल्या तीन अंकी पाच संख्या लिही.

क) 2 ने विभाज्य असलेल्या तीन अंकी पाच संख्या लिही.

आव्हानात्मक कोपरा

1) 6 मीटर लांबीची एक दोरी आहे. तिचे 50 सेमी लांबीचे तुकडे करता येतील का? कारण लिही.

2)8 मीटर लांबीची रिबन आहे. तिचे 90 सेमी लांबीचे 11 तुकडे हवे आहेत, तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल?

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 07

समजून घेऊ या : पर्यावरण, प्रदूषण.

संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक ११ (आपले घर व पर्यावरण.)

अध्ययन निष्पत्ती : स्वच्छता / आरोग्य कचरा आपत्ती आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण भूमी इंधन जंगले इत्यादी त्यांचे मार्ग सुचवतात आणि प्रदूषण कमी करण्याचे उपाय सुचवतात व पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करतात.

लक्षात घेऊ या :

पर्यावरण –

आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत जसे की, झाडे, पशु-पक्षी, नदी-नाले, डोंगर, पर्वत, वारा, भूमी, पाणी या सर्व गोष्टी म्हणजेच ‘पर्यावरण’ होय.

पर्यावरण प्रदूषण आणि आपण :

जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहे. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात ही साधने मिळण्यासाठी खालील बाबी केल्या जातात. त्यामुळे जल, • वायू, ध्वनी व मृदेचे प्रदूषण होते तसेच पर्यावरणाची हानी होते.

* डोंगर पोखरणे.

* समुद्र किनारा तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करणे. *

* जमिनीतून दगड माती काढणे जमिनीतील पाण्याचा अतिरेकी उपसा करणे. *

* जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे.

नदी ओढे नद्या खाड्या व सखल भागात भर घालून जमीन तयार करणे.

* शेती व इतर उपयोगांसाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारणी साठी वापरली जाणे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि सगळ्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत देशामध्ये ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. जंगल वाचविण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी ‘चिपको आंदोलन’ सुरु केले होते. या धरतीवर वृक्षांचे सर्वात जास्त महत्त्व आहे:

सराव करु या:

1) तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरामध्ये पर्यावरणाचे कोणकोणते घटक दिसतात ते लिहा..

………………………………………………..

2) आपला परिसर प्रदूषित होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे ?

………………………………………………..

3 ) स्वच्छतेच्या सवयीबाबतचा निष्काळजीपणा सामाजिक आरोग्याला घातक असतो. खालीलपैकी कोणकोणत्या

सवयीमुळे प्रदूषण होईल त्यांच्यासमोर x अशी खूण करा.

 विषय –  परिसर अभ्यास  2

अशी कल्पना कर की, तु जंगलात आहे आणि तुला खूप तहान लागली आहे, तुझ्याकडे कोणतेही साधन नाही, तर स्वच्छ पाणी पिण्यासाठी काय करशील?

आवश्यक साहित्य- नारळ, विविध आकाराचे दगड, भारताचा नकाशा, आंतरजाल, मोबाईल

अध्ययन अनुभव / कृती – तुला घरी नारळ सोलायला सांगितले व नारळ सोलण्यासाठी सुई, दाभण व स्क्रू – डाईव्हर (पेचकस) या तीन वस्तू दिल्या तर तु नारळ सोलण्यासाठी तीनपैकी कोणते साधन वापरशील? साधनाचे नाव व ते साधन का वापरणार ते लिही.

इयत्ता पाचवी विषय : परिसर अभ्यास २

घटक ६. अश्मयुग दगडाची हत्यारे

या प्रश्नांची उत्तरे शोधू 1

१. साधनांची निवड कशावर अवलंबून असते?

………………………………..

२. आघात तंत्र कशाला म्हणतात?

……………………………….

३. ताठ कण्याचा मानव हत्यारे कशी तयार करत?

……………………………….

४. प्रगत मानवी संस्कृतीची वाटचाल कशी सुरु झाली?

……………………………….

५. नवाश्मयुग कोणत्या काळास म्हणतात?

……………………………….