पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस पंचविसावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 25
समजून घेऊ या: सामाजिक आरोग्य, सामाजिक आरोग्याचे महत्व, व्यसनाचे दुष्परिणाम
संदर्भ : इयत्ता पाचवी प्रकरण 25 सामाजिक आरोग्य
अध्ययन निष्पत्तीः स्वछता, आरोग्य, कचरा / आपत्ती / आणीबाणीची परिस्थिति यांचे व्यवस्थापन अमि संसाधनाचे जतन व रक्षण (भूमी, इंधन, जंगले इत्यादी) यांचे मार्ग सुचवतात आणि वंचितांविषयी संवेदनशीलता दाखवतात. लक्षात घेऊ या :
पोषक आहार, वैयक्तिक स्वछता, व्यायाम आणि छंदांची जोपासना यांतून आपल्याला उत्तम आरोग्य मिळते आणि यातूनच व्यक्तीचा विकास होतो. प्रदूषण, अस्वछता, सतीचे आजार, व्यसनाधीनता, कीटांकपासून होणारे आजार या सर्वामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते. अशा आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे तसेच त्यांना स्वास्थ्यपूर्ण व आनंदी जीवन उपलब्ध करून देणे, म्हणजे सामाजिक आरोग्याची जोपासना होय.
तंबाखूसेवन व मद्यपान मृत्यूला आवाहन
तंबाखू, दारू व इतर अमली पदार्थ नशा उत्पन्न करतात. त्यांचे व्यसन शेवटी व्यक्तीचा प्राण घेते. मद्यपान, धूम्रपान व अमली पदार्थ या व्यसनाचे वाईट परिणाम प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व अशा व्यसनांपासून दूर राहावे.
तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम
तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात. व्रणांच्या जखमा होतात पुढे त्याच्या गाठी होतात. शेवटी त्या व्यक्तीला तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.
मद्यपान व्यसनाचे दुष्परिणाम
मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियत्रंण सुटते. अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. व्यसन करणाऱ्या व्यक्तीमुळे त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबालाही त्रास सहन करावा लागतो. म्हणून मग वैयक्तिक तसेच सामाजिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण भरपूर खेळावे, आहार वेळच्या वेळी घ्यावा, स्वछतेच्या सवयींचा अवलंब करावा, विविध छंद जोपासावेत. आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे.