पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एखाद्या घटनेबाबतच्या कल्पनेबाबत विद्यार्थी किती व कशाप्रकारे विचार करतात/ कल्पना करतात व लिहितात हे जाणण्यासाठी पुढील कृती द्यावी.

शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील प्रसंगी विद्यार्थ्यांना काय वाटेल ते 2 ते 3 वाक्यांत लिहिण्यास

सांगतात.

आजारी व्यक्तीला पाहून 1)

2) बाजारात फिरताना

3) क्रिकेट खेळताना चेंडू हरवला तर

4) हिरवागार निसर्ग पाहून

5)गोष्टींची पुस्तके दिसली तर

(विद्यार्थ्यांनी लिहिलेली वाक्ये पाहून एखाद्या घटनेबाबत विद्यार्थ्यांना कशाप्रकारे कल्पना करता येते व लिहिता येते हे शिक्षकांनी जाणून घ्यावे.)

4 सक्षम बनू या

शिक्षक विद्यार्थ्यांना विद्यार्थी एखाद्या घटनेबाबत कल्पना करण्यासाठी व लिहिण्यासाठी

पुढील मुद्दे सांगतील.

अ)स्वतः त्या घटनेत तुम्ही सहभागी आहात ही कल्पना करून मनात विचार आणणे करणे.

Highlight

11

Erase

a

(ब)ती घटना स्वतः अनुभवत आहात वा अनुभवली आहे हा विचार मनात आणणे.

क) ती घटना डोळ्यासमोर आणणे.

(ड) त्या घटनेतील पात्राशी जुळवून घेत त्या पात्रातील नायक आपण स्वतः आहोत हा विचार

करून कल्पना करणे.

ई) घटना आपल्या परिसरातच घडते हा विचार करणे.

शिक्षकांनी वरीलमुद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. पुढील विषयांच्या साहाय्याने

विद्यार्थ्यांना कल्पना सांगावी.

शिक्षक स्वतः “मी विद्यार्थी झालो तर या विषयावर कल्पनाविस्तार करून सांगतील.

एका एका गटाला विषय देऊन चर्चा घडवून आणण्यास मदत करतील व गटातील एकाला सादरीकरण करण्याची संधी देतील.

सराव करू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील विषयावर कल्पना करण्यास सांगावी व ती लिहिण्यास सांगावे. कोरोना संपल्यावर शाळा सुरू झाली तर काय काय होईल हे लिही

+ कल्पक होऊ या

अचानक एखादी रोगाची साथ आली तर ? याविषयी लिही. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांची

मते जाणून घेऊन काय करावे लागेल याविषयी लिहा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.

 विषय –  परिसर अभ्यास  

पहिले काही आठवूया उत्तरे सांगा.

1. तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हांला आवश्यक वाटतात?

2. ती कामे पार पाडण्यासाठी तुमचे प्रतिनधी तुम्ही कसे निवडाल?

3. वर्गा बाहेर तुम्ही कोणकोणते खेळ खेळता ?

समूहजीवनासाठी व्यवस्थापन:- हा पाठ परिसर अभ्यास भाग-१ पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक

१२७,१२८, १२९, १३०, १३१ वर दिलेला आहे.

1. अधिकची माहिती येथून मिळेल :- https://bit.ly/3wybYHP https://bit.ly/3aecTo3 या प्रश्नांची उत्तरे शोधू

११. व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती आहे ?

२. नियम का तयार केले जातात ?