पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तिसवा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या.

• मुलांसोबत त्यांच्याशी निगडीत कोणत्याही एका विषयावर गप्पा कराव्यात. या गप्पांच्या माध्यमातून मुलांना लेखन कृतीकडे घेऊन जाते. यासाठी 1) प्रत्येक विद्याथ्र्यांस बोलण्यास संधी दयावी.

२)प्रत्येक विद्याव्यांचा प्रतिसाद, शब्द अनुभव मुलांकडून माइंडमेप मध्ये आलेला

प्रतिसाद मुलांना वाचण्यास सांगावा आवश्यक तिथे वाचण्यास मदत करावी

• खालील कृती मुलांना करण्यास दयाव्यात.

4 सक्षम बनू या

• फळ्यावर माइंडमॅप काढून झाल्या नंतर खालील कृती मुलांना करण्यास द्याव्यात.

कोणत्या अक्षरावरून जास्त शब्द आले आहेत ते शोधून वहीत लिही. माइंडमॅप मधील जोडाक्षरयुक्त शब्द शोधून वाच व लिही. माइंडमॅप मधील तुला सर्वांत जास्त आवडलेली /न आवडलेली गोष्ट/घटना/प्रसंग वहीत लिही.

4 सराव करू या

मुले बोलून मोकळी झालीत की खालील लेखन कृती मुलांकडून करून घेता येतील.

• कोरोन काळात तुला कोणकोणते नवीन शब्द माहित झाले ते लिही.

• कोरोना काळात तू तुझ्या आरोग्याची काळजी कशी घेतली ते लिही.

4 कल्पक बनू या

लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा वापर तू शिकण्यासाठी कसा केला ते लिही. लांकडाउन मध्ये तू कोणत्या नवीन गोष्टीतल्या ते लिही.

 विषय –  गणित 

हे करून बघ

• पुढे दिलेल्या बाबींची माहिती गोळा करून तक्त्यात मांडणी करा. संख्यारुपात, ताळा रुपात आणि चित्र

रुपात मांडणी करा.

1) तुमच्या वर्गातील मित्र व मैत्रिणींच्या घरी कोणकोणते वाहन उपलब्ध आहे? 2) तुमच्या परिसरातील 8 ते 10 कुटुंबात मित्रांचे / मैत्रिणींचे किती किती आणि कोण कोण सदस्य आहेत. जसे आई, बाबा, भाऊ, इत्यादी.

3) तुमच्या परिसरात कोणकोणत्या प्रकारची झाडे आहेत? किती आहेत?

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका 30

समजून घेऊ या चंद्राच्या कला

संदर्भ : इ. 3 री, पाठ 25 अवतीभवती होणारे बदल.

अध्ययन निष्पत्ती : विभिन्न स्थान, कृती, वस्तूविषयी आपली निरीक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात आणि आकृतीबंधाबद्दल भाकीत करतात.

लक्षात घेऊ या

चंद्र चंद्र आकाशात पाहायला आपल्या सर्वांना आवडतो. चंद्राचा आकार दररोज सारखा असतो का ? चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते. चंद्राचा आकारही दररोज बदललेला दिसतो. तसेच आकाशात चंद्र दररोज एकाच जागी दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती सतत फिरत असतो.

चंद्राच्या कला

दररोज जे चंद्राचे निरनिराळे आकार दिसतात, त्या आकारांना चंद्राच्या कला म्हणतात. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. त्यानंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही. त्या दिवसाला अमावास्या म्हणतात. अमावास्येनंतर पंधरा दिवस चंद्राचा प्रकाशित भाग पुन्हा वाढत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो.

सराव करू या

1. कृती खालील चौकोनात तुम्ही पाहिलेले चंद्राचे वेगवेगळे आकार काढा.

2. ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो, त्या दिवसाला काय म्हणतात ?

3. अमावास्येच्या दिवशी चंद्राचा आकार कसा दिसतो ?

4. पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणते मराठी सण असतात ?

 विषय –  परिसर अभ्यास  

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.