♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस सहावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस सहावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सक्षम बनू या..

पाठ्यपुस्तकातील अथवा इतर साहित्यातील पठित किंवा अपठित उतारा वाचनास देऊन त्यामधील ज्ञात शब्दांना पर्यायी शब्द शोधून त्याची नोंद वहीत करण्यास सांगावी.

उदा. आकाश अंबर, नभ, गगन

• एकाच अर्थाचे अनेक शब्द म्हणजेच समानार्थी शब्द साखळी बनविण्याचा खेळ गटागटातून घ्यावा.

उदा. सूर्य – दिनकर, भास्कर, रवि, अरुण

पाठ्यपुस्तकातील अथवा इतर साहित्यातील पठित किंवा अपठित उतारा वाचनास देऊन परस्पर विरोधी अर्थ असणारे ज्ञात शब्द शोधून त्याची नोंद वहीत करण्यास सांगावी.

उदा. वर X खाली, सकाळ X संध्याकाळ, मोठा X लहान….

+ सराव करू या..

• विद्यार्थ्यांचे गट बनवून समान अर्थाचे व विरुद्ध अर्थाचे शब्द शोध घेण्याचा खेळ घेण्यात यावा.

• विद्यार्थ्यांना मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषेतील जसे हिंदी व इंग्रजी भाषेतील समानअर्थाचे व विरुद्ध अर्थाचे शब्द सुचवून त्यांची नोंद वहीत करण्यास सांगावी.

उदा. लेखणी पेन, कलम सदरा शर्ट, कमीज

कल्पक होऊ या..

. मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांचा शोध घेऊन त्यांची यादी बनविण्यास सांगावी.

उदा. दुनिया हा हिंदी भाषेतून आलेला शब्द मराठी भाषेत रुळला आहे. याप्रमाणे इतरही भाषेतून आलेल्या शब्दांचा शोध घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.

विद्यार्थ्यांना दररोजच्या वापरातील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधण्यास सांगावे व आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे.

उदा. रस्ता – मार्ग, वाट

 विषय –  गणित 

करून बघ

एका खेळाच्या मैदानावर ५८५ मुली रांगेत उभ्या होत्या. त्यातील १२२ मुलींनी लाल व २०३ मुलीनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. उर्वरित मुलीनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. तर पिवळे कपडे घालणाऱ्या मुलींची संख्या किती ?

 विषय –  इंग्रजी 

1] I am a fresh green cabbage.

2] I am a juicy crunchy carrot

3] I am a big red tomato.

4] I am a green leafy vegetable.

5] I am a white rabbit

.6] I am a super duper clever fox.

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतीपत्रिका : 06

समजून घेऊ या: प्राण्यांची निवाऱ्याची गरज व स्वतःसाठी निवारा तयार करणारे प्राणी.

संदर्भ : इ. 3री, पाठ 3 निवारा आपला आपला

सराव करू या :

1. माणसाला निवाऱ्याची गरज का आहे ?

2. पक्षी घरटे तयार करण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर करतात ?

3. पुढील चित्र पहा व हा निवारा कोणाचा आहे ते ओळखा. हा निवारा कशापासून तयार केला असेल ते लिहा.

विषय -परिसर अभ्यास भाग