पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस अठ्ठावीस| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

1) एक वाजून घ्यावी. नंतर सोडून वाचून घ्यावे.)

२. वाचन चालू असताना इतर मुलाचे निरीक्षण करावे. त्यांच्या प्रतिसादाचा अंदाज घ्यावा. गोष्टीचे आकलन होते का याचा अंदाज घ्यावा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट

एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एकदा त्याला खूप भुक लागली तेव्हा तो आपले भक्ष्य शोधण्यासाठी भटकत होता. तेव्हा त्याला द्राक्षांचा एक मळा दिसला. त्या मळ्यातील पांवर चढलेला वेलींवर पिकलेल्या त्या द्राक्षांचे घड पाहून त्याच्या तोडाला खूपच पाणी सुटले.

कोल्ह्याने प्रथम त्यामळ्यात कोणीही राखणदार नाही ना याची खात्री करून घेतली व मग तो त्या मळ्यात शिरता आणि एका मंडपाखाली जाऊन, खाली लोंबणारा द्राक्षांचा एक घड वेलीपासून तोडण्यासाठी उडया मारू लागला. ती द्राक्षे मिळविण्यासाठी त्याने खूप धडपड केली परंतु त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. कोल्ह्याला समजते की, ही द्राक्षे मिळविणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून आपल्या | मनाची समजूत घालण्यासाठी तो स्वतःशी म्हणाला, खरे पाहता, ही द्वाधे अगदीच आंबट आहेत आणि तरी देखील ती मिळवण्यासाठी मी उठया मारण्यात माझा उगाच वेळ गेला तेव्हा आता या निरुपयोगी द्राक्षांचा नाद सोडून आपण एखादी चांगली रूचकर शिकार मिळविण्याच्या मागे लागणे हेच ठीक आहे…

सक्षम होऊया :

कुती १. विविध म्हणी, त्यांचे अर्थ त्यातली गंमत, त्यांचा भाषेत होणारा वापर त्यामुळे समृद्ध होणारी भाषा इत्यादी विषयी शिक्षकांनी मुलांना सोप्या भाषेत सांगावे. कृती २. शिक्षकांनी गोष्टीचे आदर्श वाचन करून दाखवावे जेणेकरून मुलांना अर्थाचे योग्य आकलन होण्यास मदत होईल.

(टीप: म्हणी जरी कळण्यास काहीशा अवघड असल्या तरीही छोटया, सोप्या म्हणीचा वापर मुले दैनंदिन जीवनात निश्चित वापरू शकतात.)

4 सराव करू या

• शिक्षकांनी विविध म्हणी व त्यांचे अर्थ याचा मुलांकडून सराव घ्यावा व विविध म्हणींच्या मुलांना सांगाव्या.

कल्पक होऊयाः

शिक्षकांनी वर्गात घडणाऱ्या प्रसंगावरून एखादी म्हण त्याच्याशी कशी सुसंगत होऊ शकते याचे उदाहरण द्यावे व खालील कृती करून घ्यावी. गवचि घर खाली या म्हणीवर आधारित वर्गात घडलेली गोष्ट तयार करून सांगा

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका 28

समजून घेऊ या प्रदेश व व्यवसायानुसार कपड्यांतील विविधता.

संदर्भ : इ. 3 री, पाठ 24 आपले कपडे

अध्ययन निष्पत्ती विभिन्न स्थान, कृती, वस्तू विषयी आपली निरीक्षणे, अनुभव, माहिती विविध प्रकारांनी नोंदवतात.

लक्षात घेऊ या

प्रदेशानुसार कपड्यांतील विविधता आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. तेथील चालीरिती, सण-समारंभ यात विविधता आढळते. तसेच प्रदेशानुसार पोशाखातही विविधता आढळते. तसेच वेगवेगळ्या परंपरेनुसार कपड्यांत विविधता आढळते.

 विषय –  परिसर अभ्यास  

या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.