♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

शिष्यवृती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी २०२२ आवेदनपत्र भरणेकरीता मुदतवाढ व शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे बाबत प्रसिद्धी पत्रक

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.

तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते ३१ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक ३१ जानेवारी, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. दि. ३१ जानेवारी, २०२२ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र किंवा शुल्क भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

आवेदनपत्र भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने दि. २०/०२/२०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. सबब परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

संबंधित अधिसूचनेची पीडीएफ

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा