[ad_1]
४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या सॅमसंगच्या या फोनची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. या फोनची विक्री आजपासून अॅमेझॉन आणि कंपनीची अधिकृत साइटवरून करण्यात येणार आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी पल्स सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. फोनमध्ये गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन दिला आहे. तसेच गॅलेक्सी एम २१ मध्ये Exynos 9611 प्रोसेसर आणि ग्राफिक्स साठी माली-G72 MP3 GPU दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.
या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि तिसरा लेन्स ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४जी, वायफाय, जीपीएस, यूएसबी सी पोर्ट, ३.५ एमएमचा हेडफोन जॅक आणि बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमधेय ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनचे वजन १८८ ग्रॅम इतके आहे.
‘वर्क फ्रॉम होम’साठी स्वस्त व मस्त ‘टॉप ५’ लॅपटॉप
[ad_2]
Source link