Reliance Jio new plan: जिओ युजर्संना ‘गुडन्यूज’, नव्या प्लानमध्ये २५२ GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग – reliance jio new plan rs 999 offering daily 3gb data and unlimited calling for 84 days

[ad_1]

रिलायन्स जिओने (Reliance Jio) ने ९९९ रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे. कंपनीच्या वेबसाईटवर हा प्लान आता दिसत आहे. प्लानमध्ये दोन महिन्यांची वैधता आणि एकूण २५२ जीबी डेटा दिला जाणार आहे. कंपनीने या प्लानमध्ये अनेक नवीन फायद्याचा समावेश केला आहे. ज्या युजर्संना जास्त डेटा खर्च करायला आवडते त्या युजर्संना हा प्लान फार आवडू शकतो. या प्लानसोबत कंपनीने अन्य काही फायदे दिले आहेत. जानेवारी २०२० मध्ये एकूण ११५.६ कोटी मोबाइल युजर्संची संख्या नोंदवण्यात आली आहे. यात जिओची ३७.६ कोटी, व्होडाफोन-आयडियाची ३२.९ कोटी, एअरटेलची ३२.८ कोटी आणि भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची ११.९ कोटी युजर्स आहेत. जाणून घेऊ या नवीन प्लान आणि त्यांच्या फायद्याविषयी….

​९९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्स

maharashtra times

८४ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये युजर्संना दरदिवशी ३ जीबी याप्रमाणे एकूण २५२ जीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये युजर्संना ३००० मिनिट्स मिळणार आहे. दररोज १०० फ्री एसएमएस ऑफर केले जात आहे. या प्लानसोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

​या प्लानमध्ये दरदिवशी ३ जीबी डेटा

maharashtra times

९९९ रुपयांच्या या प्लान आधी कंपनी दरदिवशी ३ जीबी डेटा देणारा केवळ एकच प्लान ऑफर करीत होती. ३४९ रुपयांच्या या प्लानमध्ये युजर्संना दरदिवशी ३ जीबी या प्रमाणे एकूण ८४ जीबी डेटा मिळत होता. प्लानमध्ये जिओ नंबरसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १००० मिनिट्स ऑफर केले जात आहे. दर दिवशी १०० फ्री एसएमएस सोबत या प्लानमधील युजर्संना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

​२३९९ रुपयांचा नवीन प्लान लाँच

maharashtra times

रिलायन्स जिओने नुकताच २३९९ रुपयांचा एक नवीन वार्षिक प्लान लाँच केला आहे. ३६५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये ७३० जीबी डेटा दरदिवशी मिळतो आहे. दरदिवशी २ जीबी याप्रमाणे अकाउंटमध्ये क्रेडिट केला जातो. युजर्संना दरदिवशी १०० एसएमएस मिळतात. तसेच जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. नॉन जिओ नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये युजर्संना १२ हजार फ्री मिनिट्स मिळणार आहे. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

जिओचे मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये सर्वाधिक ग्राहक

maharashtra times

भारतीय संचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या माहितीनुसार, जिओचे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सर्वाधिक ग्राहक आहेत. जिओचे या दोन राज्यात ७.४६ कोटी ग्राहक आहेत. तसेच कंपनीने एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाला मागे टाकले आहे. त्यामुळे या सर्कलमध्ये कंपनीच्या ग्राहकांची एकूण संख्या २.९५ कोटी झाले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये व्होडाफोन-आयडियाच्या युजरबेसमध्ये घसरण झाली आहे. व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांची संख्या ७.८४ लाख कमी झाली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड टेलिकॉम बाजारात जिओची ३९.६ टक्के भागीदारी आहे.

[ad_2]

Source link

Leave a comment