[ad_1]
एकूण १० जीबी डेटा फ्री मिळणार
अनेक युजर्संने या संदर्भात टेक फोरम्सवर पोस्ट केले आहे. कंपनीने २ जीबी डेली डेटा अॅड ऑन डेटा पॅक त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट केले आहे. या युजर्संना हा डेटा ५ दिवसांच्या वैधतेसह दिला जातो. या प्रमाणे या युजर्संना एकूण १० जीबी अतिरिक्त डेटा फ्री मिळतो. दररोज २ जीबी डेटा या प्रमाणे या ग्राहकांना एकूण १० जीबी डेटा दिला जातो. विशेष म्हणजे, हा डेटा त्या युजर्संच्या मंथली किंवा डेली डेटा व्यतिरिक्त दिला जातो.
कोणत्या युजर्संना मिळणार फ्री डेटा
कंपनी नेमके कोणत्या युजर्संना फ्री डेटा देत आहे. हे अधिक स्पष्ट झाले नाही. अनेक युजर्संना रँडम प्रमाणे हा डेटा मिळत आहे. हा डेटा सध्या डेटा कोटासोबत दिला जात आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या सध्याच्या प्लानसोबत अतिरिक्त डेटा दिला जात आहे. जिओने आधीपासूनच आपल्या युजर्संना अधून मधून फ्री सेवेचा लाभ द्यायला सर्वात आधी सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनी काही वर्षातच अन्य कंपन्यांना मागे टाकून देशतील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
असे चेक करा, तुम्हाला डेटा मिळाला की नाही
तुम्हाला फ्री डेटा मिळाला की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला माय जिओ अॅप मधील माय प्लान्स सेक्शन मध्ये जावे लागेल. या ठिकाणी डेटा पॅक टायटलच्या आतमध्ये डिटेल्स समोर दिसेल. जर तुम्हाला एक्स्ट्रा डेटा मिळाला असेल तर सध्याच्या प्लानसोबत एक्स्ट्रा डेटा सुद्धा दिसेल. जिओ नेमक्या कोणत्या ग्राहकांना फ्री डेटा देतोय, हे अधिक स्पष्ट न झाल्यामुळे ज्या ग्राहकांना फ्री डेटा मिळाला आहे. तो त्यांच्या खात्यात क्रेडिट झालेला दिसतो.
आधीही जिओने फ्रीमध्ये दिलाय डेटा
जिओने एप्रिलमध्ये युजर्सला फ्री अतिरिक्त डेटा दिला होता. या आधी २०१८ मध्ये जिओ सेलेब्रेशन पॅक अंतर्गत सुद्धा जिओने आपल्या युजर्संना एक्स्ट्रा डेटा दिला होता. जिओ नेहमीच आपल्या युजर्संसाठी नवीन-नवीन प्लान आणते. तसेच युजर्संना फ्री डेटा देते. जिओच्या अनेक प्लानमध्ये युजर्संना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. जिओ ते जिओ फ्री कॉलिंगसह जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन अनेक प्लानमध्ये दिले जाते.
[ad_2]
Source link