[ad_1]
नव्या फोनचा टीझर रेडमीने जारी केला आहे. या टीजरमध्ये कोणतीही माहिती नाही. परंतु, टीझर करण्यात आलेल्या पोस्टमधून अंदाज बांधला जातोय की, कंपनी Redmi 8A ला अपग्रेड मॉडेलला लाँच करण्याची तयारी करीत आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर भारतात Redmi 9A लाँच करण्याची शक्यता आहे. शाओमी इंडियाचे अध्यक्ष मनु कुमार जैन यांनी शाओमीच्या ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. Redmi इंडिया कडून जारी करण्यात आलेल्या ट्विट आणि शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर बनवलेला मायक्रो-साइट मध्ये कंपनीने पुढच्या फोनची घोषणा केली आहे. देश का दमदार स्मार्टफोन’ अशा टॅगलाइनसह हा टीझर जारी करण्यात आला आहे. शाओमीने याआधी रेडमी ६ए, रेडमी ७ए, आणि रेडमी८ए, असे फोन लाँच केले आहेत. ‘देश का स्मार्टफोन’, ‘स्मार्ट देश का फोन’ आणि ‘स्मार्ट देश का दमदार स्मार्टफोन’ अशा टॅगलाइनसह हे फोन लाँच करण्यात आले होते. म्हणून ‘देश का दमदार स्मार्टफोन’ अशी टॅगलाइन असल्याने हा Redmi 9A असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Brace yourselves for the first #Redmi launch of 2020, launching on 11th Feb, 12 noon! #MorePowerToRedmi Not 1️⃣… https://t.co/QkgP7JTriP
— Manu Kumar Jain (@manukumarjain) 1580968216000
रेडमीचा फोन भारतात ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. यासंबंधी कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही. हा फोन ऑनलाइन लाँच करण्यात येणार की खास कार्यक्रमात लाँच करण्यात येणार यासंबंधी अद्याप माहिती उघड करण्यात आली नाही. मायक्रो साइटच्या माहितीनुसार या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे. मनु कुमार जैन यांनी शाओमीच्या चाहत्यांना ही माहिती दिली असून ११ फेब्रुवारी रोजी सरप्राइज मिळणार असल्याचे म्हटले आहे. यात तो रेडमी फोन असू शकतो किंवा रेडमी पॉवर बँक असू शकते, असे सांगितले जात आहे.
Nokia 1.3 : नोकिया १.३ चे खास वैशिष्ट्ये लाँचआधीच लिक
Redmi : शाओमीच्या नव्या रेडमी फोनचा टीझर पाहिला?
[ad_2]
Source link