new bharat fiber plan : BSNL चा नवा प्लान; रोज मिळणार 2TB डेटा – bsnl launches new bharat fiber plan without fup limit

[ad_1]

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने नवीन भारत फायबर प्लान लाँच केला आहे. या प्लानची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. कंपनीने हा प्लान तामिळनाडू आणि चेन्नई टेलिकॉम सर्कलमध्येच लाँच केला आहे. बीएसएनएलकडून आता २ हजार ९९९ रुपयात FTTH प्लान भारत फायबर प्लान अंतर्गत ही ऑफर देण्यात येणार आहे. नवा भारत प्लानमध्ये २००० जीबी किंवा २ टीबी डेटा ग्राहकांना प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. या प्लानमध्ये युजरला १००Mbps चा इंटरनेट वेग सुद्धा मिळणार आहे.

या प्लानमधून ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि अॅमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. याची किंमत ९९९ रुपये आहे. परंतु, या प्लानमध्ये युजरला सर्विस फ्री मिळणार आहे. बीएसएनएलचे देशभरात ७ भारत फायबर प्लान सुरू आहेत. तसेच खास सर्कलसाठी सुद्धा हे प्लान आहेत. १ हजार ९९९ रुपये आणि २ हजार ९९९ रुपयांचा प्लान कंपनी देत आहे. हे सर्व प्लानसाठी एफयूपीची मर्यादा नाही. जिओच्या २ हजार ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजरला १५०० जीबी डेटा तसेच ५०० Mbps चा वेग मिळणार आहे. ६ महिन्यानंतर डेटा बेनिफिट १२५० जीबी डेटा मिळणार आहे. या तुलनेत BSNL च्या २ हजार ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला १०० एमबीपीएसचा वेग मिळणार असून २ टीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये कोणतेही एफयूपी मर्यादा नाही.

महाराष्ट्र, गोवा सर्कलमध्ये या प्लानची किंमत ५५५ रुपये आहे. हा प्लान महिन्याभरासाठी आहे. ग्राहकांना १०० जीबी डेटा मिळतो. १०० जीबीचा वेग २० एमबीपीएस आहे. त्यानंतर तो कमी होऊन १ एमबीपीएस होतो. ग्राहकांना या नेटवर्कवरून अनलिमिटेड कॉलिंग मिळते. BSNLचा ७४९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान अनेक सर्कलमध्ये सुरू आहे. यात एका महिन्यात ३०० जीबी डेटा दिला जातो. ३०० जीबी डेटापर्यंत स्पीड ५० एमबीपीएस मिळतो. त्यानंतर तो कमी होऊन २ एमबीपीएस होतो. BSNLचा ७७७ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान अनेक सर्कलमध्ये आहे. यात एका महिन्यांसाठी ५०० जीबी डेटा दिला जातो. ५०० जीबी डेटापर्यंत ५० एमबीपीएसचा वेग मिळतो. त्यानंतर कमी होवून २ एमबीपीएस होतो.

Redmi चाहत्यांसाठी ११ फेब्रुवारीला ‘सरप्राइज’

Nokia 1.3 : नोकिया १.३ चे खास वैशिष्ट्ये लाँचआधीच लिक

Redmi : शाओमीच्या नव्या रेडमी फोनचा टीझर पाहिला?

रियलमी C3 भारतात लाँच, किंमत ६,९९९ ₹



[ad_2]

Source link

Leave a comment