oppo find x2 series: भारतात येत आहेत दोन जबरदस्त फोन, १७ जूनला लाँचिंग – oppo find x2 series to launch in india on 17 june, company confirms in a tweet

[ad_1]

नवी दिल्लीःओप्पो (Oppo) ने आपला बहुप्रतिक्षीत समार्टफोन सीरिज ओप्पो फाईंड एक्स २ (Find X2) च्या लाँचिंगची भारतातील तारीख अखेर जाहीर केली आहे. कंपनीने आपला लेटेस्ट टीझरमध्ये हे कन्फर्म केले आहे की, भारतात फाईंड एक्स २ सीरीज १७ जून रोजी लाँच करणार आहे. अॅमेझॉन इंडियावर या फोनचा टीझर पेज लाइव्ह करण्यात आला आहे. सध्याची स्थिती पाहून हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. हा कार्यक्रम १७ जून रोजी ४ वाजेपासून लाइव्ह पाहता येणार आहे.

वाचाः वर्षभर चालणारे एअरटेलचे बेस्ट प्लान, हे आहेत फायदे

कंपनी गेल्या काही दिवसांपासून या सीरिजला टीझ करीत आहे. युरोपात कंपनीने ही सीरिज काही महिन्यापूर्वी लाँच केली आहे. भारतात सर्वात आधी लाँच करण्याचा कंपनीचा प्रयत्न होता. परंतु, करोना व्हायरसमुळे तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने कंपनीला ते शक्य झाले नाही. त्यामुळे कंपनीला लाँचिंग पुढे ढकलावी लागली.

फाइंड एक्स सीरिजची किंमत
भारतात या फोनची किंमतीची घोषणा फोन लाँचिंग करण्यात आल्यानंतर करण्यात येईल. परंतु, युरोपमध्ये लाँच करण्यात आलेल्या फोनच्या किंमतीवरुन संभावित किंमत असू शकते. युरोपमध्ये या सीरिजची किंमत ८९९ युरो म्हणजेच ८३,००० रुपये आहे. भारतात सुद्धा फाइंड एक्स २ ची किंमत याच्या आसपास असू शकते.

Oppo Find X2 चे जबरदस्त फीचर्स

ओप्पो फाइंड एक्स २ मध्ये ६.७ इंचाचा QHD+ अल्ट्रा व्हिजन डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ६ प्रोटेक्शन दिले आहे. हँडसेट अँड्रॉयड १० वर बेस्ड कलरओएस ७.१ वर चालतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आणि १२ जीबी रॅम आहे. फाइंड एक्स २ मध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि १३ मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ओप्पो फाइंड एक्स २ ४२०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी 65 वॅट SuperVOOC 2.0 फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजी सपोर्ट करतेय. कनेक्टिविटीसाठी हँडसेटमध्ये ५ जी, ४ जी एलटीई, वायफाय ६ ब्लूटूथ ५.१, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाईप सी पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचाः गुगल प्ले स्टोरवरून चिनी अॅप्स डिलिट करणारे अॅप हटवले, जाणून घ्या कारण

OPPO Find X2 Pro चे वैशिष्ट्ये

OPPO Find X2 Pro या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये १२ जीबी रॅम प्लस ५१२ जीबीचा स्टोरेज दिला आहे. हा फोन अँड्रॉयड व्ही १० वर चालतो. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ४२६० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर ५८५ प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 48MP + 48MP + 13MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे.

वाचाः ‘मेड इन चायना’ फोन खरेदी करायचा नाही?, हे ‘टॉप १०’ ऑप्शन आहेत बेस्ट

वाचाः ५ मिनिटात विकले गेले १०० कोटी रुपयांहून अधिक फोन

[ad_2]

Source link

Leave a comment