Airtel offer: वर्षभर चालणारे एअरटेलचे बेस्ट प्लान, हे आहेत फायदे – airtel offering best yearly three plan to users know details

[ad_1]

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी Airtel ने आपल्या युजर्ससाठी अनेक बेस्ट वार्षिक प्लान ऑफर केले आहेत. या प्लान्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यातून वारंवार रिचार्ज करण्यापासून सुटका मिळेल. तसेच, याशिवाय यात वर्षभराची वैधता मिळणाऱ्या या प्लानमध्ये ७३० जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. एअरटेलने आपल्या युजर्संसाठी एका वर्षांपर्यंत वैधता देणारे कोणकोणते प्लान आणले आहेत.


वाचाः गुगल प्ले स्टोरवरून चिनी अॅप्स डिलिट करणारे अॅप हटवले, जाणून घ्या कारण

२४९८ रुपयांचा प्लान
३६५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना दररोज २ जीबी डेटा या प्रमाणे एकूण ७३० जीबी हाय स्पीड इंटरनेट डेटा दिला जातो. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करण्याची सुविधा मिळते. एअरटेल एस्क्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लानमध्ये सब्सक्रायबर्सला फास्टटॅग खरेदी करण्यावर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

२३९८ रुपयांचा प्लान
वर्षभराची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस सोबत देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. २४९८ रुपया प्रमाणे याही प्लानमध्ये ५ जी प्रीमियम, एअरटेल एस्क्ट्रिम आणि विंक म्युझिकचे फ्री अॅक्सेस दिले जाते. या प्लानच्या सब्सक्रायबर्सला फास्टटॅग खरेदी करण्यावर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

१४९८ रुपयांचा प्लान
ज्या युजर्संना जास्त कॉलिंगची गरज आहे. त्यांच्यासाठी हा प्लान चांगला आहे. या प्लानमध्ये ३६५ दिवसांची अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. ३६०० फ्री एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स मिळतात. या प्लानमध्ये डेली डेटा मिळत नाही. या प्लानला सब्सक्राबर्स केल्यानंतर खात्यात एकूण २४ जीबी डेटा क्रेडिट केला जातो. हा डेटा युजर्स कधीही वापरू शकतो.

वाचाः ‘मेड इन चायना’ फोन खरेदी करायचा नाही?, हे ‘टॉप १०’ ऑप्शन आहेत बेस्ट

वाचाः ५ मिनिटात विकले गेले १०० कोटी रुपयांहून अधिक फोन

[ad_2]

Source link

Leave a comment